विशेष प्रतिनिधी
मुबंई : सध्या कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांच्या लग्नाच्या चर्चा पाहाव्या तिकडे सुरू आहेत. कंगना रणौतने या दोघांच्या वयातील अंतरावरून एक विधान देखील केले होते. ते देखील प्रचंड व्हायरल झाले होते. पण वयाने लहान असणाऱ्या मुलासोबत लग्न करणारी कॅटरिना ही पहिली अभिनेत्री नाहीये. बॉलिवूड मधील बऱ्याच अभिनेत्रींनी वयाने लहान असणाऱ्या मुला सोबत लग्न केले आहे. चला पाहूया अशा कोणकोणत्या अभिनेत्री आहेत.
Bollywood actress who got married to a young man
1. प्रियांका चोप्रा आणि निक जोनास : प्रियांका चोप्रा ही निक जोनस पेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. या दोघांनी 2018 मध्ये लग्न केले होते. दोघे सुखाने संसार करत आहेत. एक पॉवर कपल म्हणून ह्या दोघांना पाहिले जाते.
2. कॅटरिना कैफ आणि विकी कौशल : कॅटरिना ही 38 वर्षांची आहे तर विकी 33 वर्षांचा आहे. कॅटरिना विकि पेक्षा पाच वर्षांनी मोठी आहे. तरी दोघे थाटामाटात राजस्थान मध्ये पारंपरिक पद्धतीने लग्न करत आहेत.
कॅटरिना कैफच्या घरचे मुबंईत दाखल! विकी कौशल आणि कॅटरिना च्या लग्नाच्या चर्चांना यामुळे अजून जोर चढला
3. सोहा अली खान आणि कुणाल खेमू : सोहा अली खान ही सैफ अली खानची बहीण आहे. त्याचप्रमाणे तिने बऱ्याच चित्रपटांमध्ये देखील अभिनय केला आहे. कुणाल खेमू बालपणापासून अभिनय क्षेत्रामध्ये सक्रिय आहे या दोघांमध्ये 5 वर्षांचं अंतर आहे. सोहा त्याच्यापेक्षा 5 वर्षांनी मोठी आहे. या दोघांना एक गोंडस मुलगी देखील आहे.
4. ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चन : या दोघांनी जेव्हा लग्न केले तेव्हा ऐश्वर्या 34 वर्षांची होती. आणि अभिषेक 31 वर्षांचा होता. ऐश्वर्या अभिषेक पेक्षा 3 वर्षांनी मोठी आहे. या दोघांनीही चांगला संसार केला आहे. या दोघांना आराध्या नावाची एक मुलगी आहे.
5. सुष्मिता सेन आणि रोहन शॉल : सुष्मिता सेन ही संपूर्ण भारताची आवडती अभिनेत्री आहे. सुष्मिताचे वय 46 आहेत तर तिच्या बॉयफ्रेंडचे वय 29 आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App