बोल्ड, ब्युटीफुल, फेमिनिस्ट स्मिता पाटील

विशेष प्रतिनिधी

मुंबई : स्मिता पाटील. आज इतक्या वर्षांनीही अगदी आपलंसं वाटणारे नाव म्हणजे स्मिता पाटील होय. बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे आयकॉनिक आणि लेजेंड म्हणून नेहमीच आठवणीत राहतील. स्मिता पाटील त्यापैकीच एक.

Bold, beautiful and feminist Smita Patil

१९७५ साली प्रदर्शित झालेल्या श्याम बेनेगल यांच्या ‘चरणदास चोर’ या सिनेमातून त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. त्या आधी त्या दूरदर्शनवर न्यूज रीडर म्हणून काम करायच्या. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, पुणे येथून त्यांनी आपले ग्रॅज्यूएशन केले होते. एक यशस्वी अभिनेत्री असण्यासोबतच स्मिता पाटील ओळखल्या जायच्या आता त्यांच्याच फेमिनिस्ट विचारांसाठी. त्यांनी बऱ्याच स्त्रीकेंद्रित सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.

सध्या त्यांचा एक व्हिडिओ इंटरनेटवर प्रचंड व्हायरल होताना दिसून येतोय. या व्हिडिओमध्ये त्यांनी बॉलीवूडमधील स्त्रियांच्या बॉडी शो ऑफला कसे एन्कॅश केले जाते याविषयी अतिशय स्पष्ट आणि परखड असे आपले मत व्यक्त केले आहे.


Bollywood ला खानदानी stars हवेत; कलाकार नकोत…!!


त्यांच्या ‘चक्र’ या सिनेमाच्या प्रमोशनसाठी या चित्रपटातील एक सीन पब्लिसिटीसाठी वापरण्यात आला होता. चित्रपटामध्ये छोटं घर असल्यामुळे दारात आंघोळ करणारी स्त्री त्या सीन मध्ये दाखवण्यात आली होती. ती स्त्री म्हणजेच स्मिता पाटील होत्या. या सिनेमाच्या प्रदर्शनावेळी डिस्ट्रीब्युटर्सनी या सिनेमा मधील हाच सीन पब्लिसिटीसाठी वापरला होता.

तर या इंटरव्यूमध्ये स्मिता पाटील यांनी या गोष्टीवर आपले परखड असे मत व्यक्त केले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार जर स्त्रियांचे जास्तीत जास्त अंग ऑनस्क्रीन दिसत असेल तर लोकांची सिनेमाबद्दलची उत्सुकता वाढते आणि लोक सिनेमा पाहण्यासाठी गर्दी करतात. असे सिनेमे प्रचंड हिट होतातच. पुढे त्या म्हणतात, जर माझ्या हातात ह्या गोष्टी असतील तर असे अजिबात होणार नाही याची मी काळजी घेतली असती. फीमेल हे एक सेक्स आहे. आणि त्यांच्या बॉडीचा वापर पैसे मिळवण्यासाठी केला जातो हे अतिशय दुःखद आहे.

आणखी एका व्हिडीओ मध्ये त्या म्हणताहेत, चित्रपटांमध्ये स्त्रीला सहनशील, कमजोर, हेल्पलेस स्त्री म्हणून दाखवले जाते. आणि ह्या स्त्रिया समाजासमोर एक आदर्शवादी स्त्रीया म्हणून सिनेमा मार्फत ठेवण्यात येते. चित्रपटां मध्ये या स्त्रियांचे पती किंवा त्यांचा प्रियकर त्यांना अर्ध्यावर सोडून जातो असा काहीतरी सीन दाखवला जातो. आणि या स्त्रियांच्या सहनशील स्वभावामुळे ते त्यांच्याकडे परत येतात असे देखील दाखवले जाते. त्यामुळे समाजातील इतर सामान्य स्त्रियांनाही वाटत राहते की, आपणही ह्या सिनेमात दाखवण्यात आलेल्या अभिनेत्री सारखे सहनशील राहिलो तर आपल्या आयुष्यामध्येही जसे सिनेमामध्ये चांगला शेवट होतो तसे काहीतरी चांगले घडेल.

https://www.instagram.com/reel/CSG07u_HO62/?utm_source=ig_web_copy_link

पण सत्यता काही वेगळीच असते. स्त्रियां कणखर, स्ट्राँग विल पॉवर असणाऱ्या खमक्या स्त्रिया म्हणून का सिनेमात दाखवले जात नाही? चित्रपटात दाखवण्यात येणाऱ्या स्त्रीच्या प्रतिमेला अतिशय चुकीच्या पध्दतीने मांडण्यात येते. असे मत त्यांनी मांडले होते.

त्यांच्या या दोन्ही व्हिडिओंना इंटरनेटवर भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

Bold, beautiful and feminist Smita Patil

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात