विशेष प्रतिनिधी
मुबंई : क्रुझ ड्रग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आर्यन खान याला नुकताच जामीन मिळाला आहे. त्यामुळे शाहरुख खानच्या घरी आनंदाचे वातावरण आहे. आज आर्यन खानचा वाढदिवस आहे. तो 24 वर्षांचा झाला. आर्यन खानच्या वाढदिवसानिमित्त त्याची बहिण सुहाना खान हिने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या स्टोरीवर आर्यनचा एक लहानपणीचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आपल्या कजिनसोबत दिसून येतोय.
Aryan Khan’s Birthday! Sister Suhana shared an old photo to wish brother Happy Birthday
आर्यन खानला जेव्हा बेल मंजूर झाली होती, त्यावेळी देखील सुहानाने आर्यन खानसोबतचे बालपणीचे फोटो शेअर करत आपले प्रेम सोशल मीडियाद्वारे व्यक्त केले होते. आणि आजही तिने आपल्या भावा वरचे प्रेम सोशल मिडीयावर जुना फोटो शेअर करत व्यक्त केले आहे.
Aryan Khan Drugs Case: साप्ताहिक हजेरीसाठी आर्यन खान NCB कार्यालयात पोहोचला, मुंबई उच्च न्यायालयाने दिला होता सशर्त जामीन
स्टार किड्सपैकी सुहाना खान ही सर्वात फेमस स्टारकिड आहे. इंस्टाग्रामवर तिचे बरेच फॉलोअर्स आहेत. सुहाना खान सध्या परदेशामध्ये आपले शिक्षण पूर्ण करत आहे. ती लवकरच चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे अशी चर्चा आहे. झोया अख्तर हिच्या ‘द अर्चिज’ या अॅनिमेटेड नेटफ्लिक्स मूव्हीमधून ती पदार्पण करणार अशी सध्या जोरदार चर्चा चालू आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App