विशेष प्रतिनिधी
मुंबई: कोरोनामुळे लांबणीवर पडलेल्या बहुचर्चित अक्षय कुमारच्या सूर्यवंशी या चित्रपटाला ५ नोव्हेंबरचा मुहूर्त मिळाला आहे. उद्या हा चित्रपट जवळपास पाच हजार दोनशे स्क्रीनवर प्रदर्शित केला जाईल. फक्त भारतातच नव्हे तर इतर अनेक देशांतही हा चित्रपट दाखवला जाणार आहे. ‘सूर्यवंशी’ ने चित्रपटगृहात रिलीज होण्याआधीच बक्कळ कमाईला सुरुवात केली आहे.
Akshay Kumar suryavanshi earns this much crores before its release in theaters
अक्षय कुमार आणि कटरीना कैफ यांच्या या चित्रपटाने सुमारे २०० कोटी रुपयांची कमाई केली आहे. या चित्रपटाचे म्युझिक राइट्स ६० कोटी रुपये तर ओटीटी राईट्स हे जवळपास १४० कोटी रुपयांना विकले गेले आहेत. या सिनेमाचे बजेट हे २२५ कोटी रुपये इतके आहे. प्रमोशनसाठी यातील २५ कोटी रुपये खर्च झालेले आहेत, तर निर्मितीसाठी २०० कोटी इतका खर्च झाला आहे.
अक्षय कुमार दिवाळीत धमाका करण्यास सज्ज, सूर्यवंशी चित्रपट 5200 स्क्रीन्सवर प्रदर्शित करण्याची तयारी
दिवाळीच्या शुभमुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होत असल्याने हा चित्रपट दणक्यात कमाई करेल तसेच प्रेक्षकही तो पाहण्यास उत्सुक आहेत. अक्षय कुमार सोबतच या सिनेमात आपल्याला अजय देवगण आणि रणवीर सिंग यांचीही प्रमुख भूमिका पाहायला मिळेल. कटरीना कैफ यात अक्षय कुमारच्या पत्नीचा रोल साकारत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App