पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसच्या संकटातून अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी तब्बल २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या घोषणनेंतर देशाच्या आर्थिक क्षेत्रात नवी उर्जा आली आहे. मात्र, मोदी द्वेषाचा चष्मा घातलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून टीका सुरूच आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसच्या संकटात बाहेर काढण्यासाठी तब्बल २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. अर्थमंत्री निर्मला सितारामन यांच्या घोषणनेंतर देशाच्या आर्थिक क्षेत्रात नवी उर्जा आली आहे.
मात्र, मोदी द्वेषाचा चष्मा घातलेले माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडून टीका सुरूच आहे. विशेष म्हणजे एरवी मोदींच्या अर्थनितीवर टीका करणार्या डाव्या, समाजवादी अर्थतज्ञांपासून ते संपूर्ण उद्योग जगतातून तसेच जगभरातून या ऐतिहासिक पॅकेजचे मोकळ्या मनाने स्वागत होत असताना चिदंबरम-ममता यांनी रडका सूर लावला आहे.
चिदंबरम म्हणाले, “पंतप्रधानांनी आपल्याला हेडलाईन आणि एक ब्लँक पेज दिले आहे. आता अर्थमंत्री त्या कोर्या कागदावर काय भरतात हे पाहायचे आहे. अर्थव्यवस्थेत टाकल्या जाणार्या प्रत्येक अतिरिक्त रुपयावर आमची नजर आहे.”
ममता बॅनर्जी यांनी पॅकेजमध्ये राज्यांसाठी काहीच नसल्याचं म्हटलं आहे. तसंच हे पॅकेज एक मोठा शून्य आहे. लोकांच्या डोळ्यात धूळ फेकत त्यांची दिशाभूल केली जात आहे, असाही आरोप केला आहे.
असंघटित क्षेत्र तसंच रोजगार निर्मितीसाठी या पॅकेजमध्ये काहीच नाही. वित्तीय जबाबदारी आणि अर्थसंकल्प व्यवस्थापनासंबंधीही काही अपेक्षा होत्या. पण आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी घोषणा केल्यानंतर नरेंद्र मोदींनी सांगितलेलं सगळं दिशाभूल होती असे लक्षात आले आहे, असे ममता यांचे म्हणणे आहे.
Array