भारतीय लष्कराचे जवान रविवारी (३ मे) फ्लाय पास्ट करीत कोविड १९ रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करणार आहेत. चीनी व्हायरसविरुध्द लढाई लढणाऱ्या कोविड योध्यांचे कौतुक करत त्यांना अनोखी मानवंदा दिली जाणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे जवान रविवारी (३ मे) फ्लाय पास्ट करीत कोविड १९ रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करणार आहेत. चीनी व्हायरसविरुध्द लढाई लढत असलेल्या कोविड योध्यांचे कौतुक करत त्यांना अनोखी मानवंदा दिली जाणार आहे.
देशातील चीनी व्हायरसच्या संकटप्रसंगी लष्कर देशवासियांसोबत आहेत. जनतेची उमेद वाढविण्यासाठी लष्करातर्फे विविध उपक्रम राबविणार असल्याची माहिती देशाचे संरक्षण प्रमुख (चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ) जनरल बिपिन रावत यांनी दिली. या पत्रकार परिषदेस लष्कर प्रमुख मनोज नरावणे, एअर चीफ मार्शल बीरेंद्रसिंह धनोआ, अॅडिमिरल करमबीर सिंह उपस्थित होते. यावेळी, भारतीय सेना करोना व्हायरसविरुद्ध सुरू असलेल्या लढाईत गुंतलेल्या प्रत्येक ‘करोना योद्ध्या’चं कौतुक करण्यासाठी ३ मे रोजी फ्लाय पास्ट करत कोविड १९ रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करणार आहे, असं सांगण्यात आलंय.
नौसेनेच्या युद्धनौका प्रकाशानं उजळवण्यात येणार आहेत. कोविड योध्यांना आम्ही सलाम करतो असे सांगताना संरक्षण प्रमुख रावत म्हणाले, देशातील तीनही दल देशात करोनाविरुद्ध लढणाऱ्या प्रत्येक करोना योद्ध्यासोबत खांद्याला खांदा लावून उभे आहे. आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी लढणाऱ्या प्रत्येक कोरोना योद्ध्याप्रती आम्ही कृतज्ञ आहोत. यातील एक फ्लाय पास्ट श्रीनगरपासून सुरू होऊन तिरुअनंतपुरमपर्यंत पोहचेल तर दुसरी फ्लाय पास्ट आसाममधील दिब्रुगडपासून कच्छपर्यंत पोहचेल. भारतीय वायुसेनेचे फिक्स्ड विंग आणि एअरक्राफ्ट या फ्लाय पास्टमध्ये सहभागी होतील.
नेव्हीचे हेलिकॉक्टर कोविड १९ च्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयांवर फुलांचा वर्षाव करतील. इंडियन आर्मी देशताील जवळपास सर्व जिल्ह्यांतील काही कोविड रुग्णालयासोबत माउंटेन बॅन्ड दाखवतील. पोलीस दलाच्या समर्थनासाठी सशस्र दल ३ मे रोजी पोलीस मेमोरिअलवर माल्यार्पण करतील. कोविड १९ मुळे भारतीय सेनेच्या कोणत्याही योजनांवर परिणाम झालेला नाही आणि होणार नाही, असेही लष्करातर्फे सांगण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App