देशाची लाइफलाइन ही उपमा सार्थ करीत भारतीय रेल्वे देशातील लाखो मजुरांसाठी जीवनदायी बनली आहे. भारतीय रेल्वेने देशभरात 350 हुन अधिक श्रमिक विशेष गाड्या चालवल्या.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशाची लाइफलाइन ही उपमा सार्थ करीत भारतीय रेल्वे देशातील लाखो मजुरांसाठी जीवनदायी बनली आहे. भारतीय रेल्वेने देशभरात 350 हुन अधिक श्रमिक विशेष गाड्या चालवल्या
रेल्वे मंत्री पियुष गोयल यावर खास देखरेख ठेऊन आहेत. त्यासोबतच रेल्वेने प्रवास करणाऱ्या मजुरांसाठी जेवणापासून सर्व व्यवस्था करण्यासाठी काम करत आहेत. रेल्वे विभागाच्या साधनासोबत उद्योग क्षेत्राकडूनही मदत मिळवित आहेत.
चीनी व्हायरसचा उद्रेक झाल्यावर देशात लॉकडाउन जाहीर झाला. या लॉकडाऊनमुळे देशाच्या विविध भागात अडकलेले स्थलांतरित मजूर, यात्रेकरू, पर्यटक, विद्यार्थी आणि इतर व्यक्तींना विशेष रेल्वेने मूळ गावी परतता येईल याबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर रेल्वेने श्रमिक विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला.
आजपर्यंत विविध राज्यातून 350 श्रमिक विशेष गाड्या चालवण्यात आल्या, यापैकी 300 गाड्या आपल्या नियोजित स्थानी पोहोचल्या तर 58 गाड्या अद्याप वाटेवर आहेत. आज शनिवारसाठी 49 श्रमिक विशेष गाड्या नियोजित आहेत.
आंध्रप्रदेश (2 गाड्या), बिहार (90 गाड्या), हिमाचल प्रदेश (1 गाडी), झारखंड (16 गाड्या), मध्य प्रदेश (21 गाड्या), महाराष्ट्र (3 गाड्या), ओदिशा (3 गाड्या), राजस्थान (4 गाड्या), तेलंगणा (2 गाड्या), उत्तरप्रदेश (121 गाड्या), पश्चिम बंगाल (2 गाड्या) अशाप्रकारे राज्यात त्यांचा प्रवास समाप्त झाला.
या गाड्यांनी प्रयागराज, छप्रा, बलिया, गया, पूर्णिया, वाराणसी, दरभंगा, गोरखपूर, लखनौ, जौनपुर, हतिया, बस्ती, कथिहार, दानापूर, मुझफ्फरपूर, सहारसा इत्यादी ठिकाणी प्रवाशांना पोहोचवले आहे.
‘सोशल डिस्टन्सिंग’चे पालन करत जास्तीत जास्त सुमारे बाराशे प्रवासी या श्रमिक विशेष गाडीतून प्रवास करू शकतात. गाडी सुरु होण्यापूर्वी प्रवाश्यांची तपासणी सुनिश्चित करण्यात येते. प्रवासादरम्यान प्रवाशांना मोफत भोजन आणि पाणी पुरविले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी रेल्वेच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
Array