केंद्र सरकार चीनी व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करत आहे. संपूर्ण जगावरच अभूतपूर्व असे संकट आल्याची जाणीव सर्वसामान्य देशवासीयांना देखील आहे. आपत्तीतून वाट काढण्यासाठी सर्व समाजघटक एकोप्याने प्रयत्न करताना दिसत आहेत. मात्र या वस्तुस्थितीचे भान कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांना असल्याचे दिसत नाही. जनतेला दिलासा देण्याऐवजी त्यांनी अराजकाचे भाकीत केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केंद्र सरकार चीनी व्हायरसच्या संकटावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करत असताना कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांची भडकाऊ भाषा सुरूच आहे. गरीब, मजूर, शेतकरी आणि सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगांना सरकारने तातडीने मदत दिली नाही तर देशात आर्थिक अराजकता माजेल, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला आहे.
चीनी व्हायरसचे संकट म्हणजे आपल्या राजकारणासाठी सुवर्णसंधी असल्याचे राहुल गांधी यांना प्रथमपासून वाटत आहे. सुरूवातीला त्यांनी देशाच्या १० टक्के जीडीपीइतके आर्थिक पॅकेज देण्याची मागणी केली होती. केंद्र सरकारने हे पॅकेज जाहीरही केले आहे. परंतु, त्यामुळे राहुल यांचे समाधान झालेले नाही. आपत्तीची स्थिती धीराने आणि संयमाने हाताळत असल्याबद्दल संपूर्ण जग भारताच्या नेतृत्त्वाचे आणि भारतीय जनतेचे कौतुक करत असताना राहुल गांधी मात्र देशातील गोरगरीबांना भडकाविण्याचे काम करत आहेत. त्यातूनच त्यांनी देशात अराजकता माजण्याचे भाकीत वर्तवले आहे.
संकटाच्या या काळात सरकारला सहकार्य करण्यापेक्षा घेरण्याची भूमिका घेऊन कॉंग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षांची बैठक झाली. या बैठकीत राहूल गांधी यांनी लोकांना भडकाविण्याची भाषा केली आहे. ते म्हणाले, लॉकडाऊनचे दोन उद्देश होते. चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव रोखणं आणि लढाईसाठी तयारी करणे. पण देशात रुग्ण वाढतच आहेत आणि लॉकडाऊनचे नियम काही प्रमाणात शिथिल करण्यात आलेत. यामुळे अचानक केलेल्या लॉकडाऊनमुळे सरकारच्या हाती यश आलेले नाही, हे स्पष्ट केले आहे.
मात्र, त्यांनी केंद्रीय सांख्यिकी विभागाने केलेल्या अभ्यासाकडे पाहिले नाही. लॉकडाऊनमुळे देशात किमान दोन लाख जणांच प्राण वाचले आहेत. परंतु, तरीही त्याच्यावर टीका करणे राहूल गांधींनी सुरूच ठेवले. लॉकडाऊनमुळे कोट्यावधक्ष नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आता त्यांना मदत दिली गेली नाही, त्यांच्या खात्यात ७५०० रुपये जमा केले नाही, त्यांना रेशन दिले गेले नाही, स्थलांतरीत मजुरांना आणि शेतकºयांना सूक्ष्म-लघु आणि मध्यम उद्योगांना मदत दिली गेली नाही तर आर्थिक अराजकता माजेल, असे राहुल गांधी म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App