पालघर झुंडबळीच्या घटनेवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणे आणि वैयक्तिक पातळीवर टिकाटिप्पणी करणे, तसेच सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडून होत असल्याचा आरोप राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केला आहे. गोस्वामी यांच्याविरोधात राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बुधवारी रात्री केली आहे. मात्र, सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘मौत का सौदागर’ अशी टीका केली होती. राहूल गांधी सातत्याने ‘चौकीदार चोर हैै’ म्हणत होते. ही आक्षेपार्ह भाषा नव्हती का? अशी टीका सोशल मीडियावरून होत आहे.
खास प्रतिनिधी
पुणे : पालघर झुंडबळीच्या घटनेवरून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह भाषा वापरणे आणि वैयक्तिक पातळीवर टिकाटिप्पणी करणे, तसेच सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याकडून होत असल्याचा आरोप राज्यातील काँग्रेस नेत्यांनी केला आहे. गोस्वामी यांच्याविरोधात राज्य आणि केंद्र सरकारने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी बुधवारी रात्री केली आहे.
मात्र, सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ‘मौत का सौदागर’ अशी टीका केली होती. राहूल गांधी सातत्याने ‘चौकीदार चोर हैै’ म्हणत होते. ही आक्षेपार्ह भाषा नव्हती का? अशी टीका सोशल मीडियावरून होत आहे.
पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी सर्व हद्दी पार केल्या आहेत, अशा शब्दांत राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी त्यांना धमकी दिली आहे. यावरही गेहलोत यांच्यावर टीका होत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आता कोठे गेले अशी विचारणा केली जात आहे. कॉँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांनी आज अर्णब गोस्वामी यांचा निषेध केला आहे.
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याबद्दलही अत्यंत हीन दर्जाची भाषा वापरून वैयक्तिक पातळीवर टिप्पणी केली आहे. या प्रकाराला पत्रकारिता म्हणता येणार नाही, असे म्हटले आहे. बंधुभावाचा संदेश देणार्या आपल्या देशात सामाजिक विद्वेष पसरविणे कदापि मान्य होणार नाही. देशाच्या एकतेसाठी ते घातक राहील. त्यामुळे आम्ही संयुक्तरीत्या सामाजिक वातावरण कलुषित करणार्या अर्णब गोस्वामी आणि संबंधित वृत्तवाहिनीवर कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्र सरकारकडे केली आहे.
काँग्रेसचे महासचिव मल्लिकार्जुन खर्गे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माणिकराव ठाकरे, खा. राजीव सातव, कुमार केतकर, बाळू धानोरकर, काँग्रेसचे मंत्री आणि प्रमुख नेते यावेळी उपस्थित होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App