मोदींच्या महापँकेजमध्ये असेल तरी काय? निर्मला सीतारमण दुपारी ४.०० वाजता तपशील करणार जाहीर

विशेष प्रतिनिधी

  • शेतकरी, मजूर, कामगार, सुक्ष्म, लघु, मध्यम, मोठे उद्योग या सर्वांसाठी २० लाख कोटींचे महापँकेज जाहीर करून १३० कोटी जनतेच्या अपेक्षा वाढवून ठेवल्या आहेत.
  • आता उत्सुकता आहे, या महापँकेजमध्ये नेमके असेल तरी काय? आजच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर अर्थमंत्री निर्मला सीतारमण महापँकेजमधील तपशील जाहीर करतील, ते १६ लाख कोटी रुपयांचे असतील.
  • गरीबांच्या खात्यात पैसा जमा होईल. शेती, उद्योगांना सवलती मिळतील. त्यांना वाढीव पतपुरवठा केला जाईल.
  • लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना पैसा, खेळते भांडवल वाढविणे, पतपुरवठा या स्वरूपाची मदत केली जाईल.
  • भारत केवळ १३० कोटी लोकसंख्येचा ग्राहक देश बनून राहणार नाही. तर त्याचे investment destination मध्ये रूपांतर करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आहे. यात विमा क्षेत्रातील परकीय गुंतवणूक ७४% वरून वाढविण्याचाही मनसूबा आहे. कृषिविम्याचे नेट वाढवून शेतकरी – ग्राहक साखळी मजबूत करण्याची या महापँकेजमध्ये घोषणा अपेक्षित आहे.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात