चीनी व्हायरसच्या संकटाच्या काळातही भारताकडून विश्व बंधुत्वाच्या भूमिकेचा आदर्श घालून दिला जात आहे. शेजारील राष्ट्रांना मदत करण्यासाठी मिशन सागर सुरू करण्यात आले असून नौदलाचे ‘केसरी’ हे जहाज मदतसमुग्री घेऊन निघाले आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या संकटाच्या काळातही भारताकडून विश्व बंधुत्वाच्या भूमिकेचा आदर्श घालून दिला जात आहे. शेजारील राष्ट्रांना मदत करण्यासाठी ‘मिशन सागर’ सुरू करण्यात आले असून नौदलाचे ‘केसरी’ हे जहाज मदतसमुग्री घेऊन निघाले आहे.
जागतिक महामारीचा मुकाबला संपुर्ण जगाला मिळून करावा लागणार असल्याची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मांडत आहेत. त्यावर कृतिशील पाऊल म्हणून भारताने जगातील अनेक देशांना औषधांचा पुरवठा केला आहे.
इतर देशांसाठीही अनेक उपाय योजना केल्या आहेत आणि मदतीचा हात दिला आहे. त्याचाच एक भाग म्हणजे भारतीय नौदलाचे ‘केसरी’ हे जहाज इतर देशांसाठी मदत सामुग्री घेवून आज रवाना झाले. मालदीव, मॉरिशस, सेशेल्स, मादागास्कर आणि कॉमोरोस या देशांना मदत पुरवण्यासाठी‘केसरी’ जहाज रवाना झाले. या जहाजातून अन्नसामुग्री, महामारीवर उपयोगी ठरत असलेल्या एचसीक्यू औषधाच्या गोळ्या आणि विशेष आयुर्वेदिक औषधे तसेच वैद्यकीय सहाय्यकांचे पथक आज पाठवण्यात आले.
कोविड-19 महामारी आणि त्यामुळे निर्माण झालेल्या संकटांशी सामना करण्यासाठी भारताच्या या मित्र देशांपुढे अनेक समस्या आहेत; हे जाणून, त्याचबरोबर या देशांशी असलेले दृढ ऋणानुबंध लक्षात घेवून भारताने ‘मिशन सागर’ सुरू केले आणि मदत सामुग्री पाठवली आहे. संपूर्ण क्षेत्रामध्ये अशी मोहीम सुरू करून या देशांना असा मदतीचा हात पुढे करणारा भारत पहिला देश आहे.
आपल्याबरोबरच शेजारी राष्ट्रांचा विकास होणे आवश्यक आहे, असा दृष्टीकोन पंतप्रधानांचा आहे. म्हणून ‘सेक्यूरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन’ म्हणजेच- ‘सागर’ असे नाव या मोहिमेला देण्यात आले आहे. सध्या उद्भवलेल्या चीनी व्हायरस महामारी संकटाच्या काळात क्षेत्रीय देशांना आवश्यक असणारी मदत करून संबंध अधिक मजबूत करण्यासाठी ‘मिशन सागर’ राबवण्यात येत आहे. या मोहिमेची जबाबदारी संरक्षण मंत्रालय आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालय आणि सरकारमधल्या इतर संबंधित संस्था- विभाग मिळून संयुक्त समन्वयाने पार पाडत आहेत.
मिशन सागर मोहिमेवर गेलेले भारतीय नौदलाचे ‘केसरी’ जहाज मालदीव प्रजासत्ताकातल्या माले बंदरात प्रवेश करणार आहे. तिथं 600 टन अन्नसामुग्री देण्यात येणार आहे. भारत आणि मालदीव यांच्यामध्ये अतिशय दृढ ऋणानुबंध आहेत तसेच दोघेही चांगले सागरी शेजारी आहेत. उभय देशांमध्ये संरक्षण आणि मुत्सद्दी संबंध उत्तम आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App