मानसरोवर यात्रेचा मार्ग झाला सोपा; लिपूलेख खिंडीतील ९० किमीच्या मार्गाचे उद्घाटन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कैलास मानसरोवर यात्रेचा मार्ग आता सोपा झाला आहे. उत्तराखंडमधील लिपूलेख खिंडीतून तयार केलेल्या या मार्गाचे उद्घाटन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज विडिओ कॉन्फरन्सद्वारे केले.

बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनने लिपूलेख खिंडीतील अवघड रस्त्याचे बांधकाम केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडिया अकाउंटमधून ऑर्गनायझेशनच्या या महत्त्वाकांक्षी कामगिरीचे अभिनंदन केले आहे.

कैलास मानसरोवरचे यात्रेकरू या मार्गावरून वाहनांनी थेट भारत – चीन सीमेपर्यंत जाऊ शकतील. सुमारे ८० – ९० किमीचे अवघड वळण आणि ट्रेकद्वारे मार्गक्रमण करणे लिपूलेख खिंडीतील नव्या रस्त्यामुळे टळू शकेल, असेही गडकरी यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात