पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार खासगी एजन्सीला आऊटसोर्स करण्यात आले आहे. ही अत्यंत वाईट पध्दत आहे, असा आरोप पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी केला आहे.
विशेष प्रतिनिधी
कोलकाता: पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी यांचे सरकार खासगी एजन्सीला आऊटसोर्स करण्यात आले आहे. ही अत्यंत वाईट पध्दत आहे, असा आरोप पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांनी केला आहे.
द प्रिंट या बेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत धनखड म्हणाले, अम्फान चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी ममता सरकारची कोणतीही सज्जता नव्हती. चीनी व्हायरसच्या संकटामुळे राज्यातील खिळखिळ्या आरोग्य व्यवस्थेचा वास्तव समोर आले आहे.
राज्यातील सत्ताधारी तृणमूल कॉंग्रेस सातत्याने राज्यपालांवर टीका करते. ही त्यांची सवयच बनली आहे. त्यासाठी अनेकांना कामाला लावले आहे. पण याचा रिमोट कंट्रोल दुसरीकडेच आहे.
कोणते सरकार आपली सेवा खासगी एजन्सीला आऊटसोर्स देऊ शकते का? पण बंगालमध्ये हे झाले आहे. या लोकांकडून भारतीय लोकशाहीच धोक्यात आणली जात आहे. युवकांची माथी भडकावली जात आहेत, असे सांगत धनखड यांनी अप्रत्यक्षपणे ममता बॅनर्जी यांचे रणनितीकार प्रशांत किशोर यांच्यावर टीका केली.
धनखड म्हणाले, राज्यातील आरोग्य यंत्रणेचा पायाच कुचकामी आहे. सामान्य माणसाला आरोग्य सेवा मिळणे कठीण आहे. पश्चिम बंगाल राज्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आयुष्यमान भारत योजना राबविली असती तर लोकांना त्याचा फायदा झाला असता. परंतु, राजकारणामुळे ममता बॅनर्जी यांनी जनतेला आरोग्य सुविधेपासून वंचित ठेवले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App