पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसच्या संकटाच्या काळात स्वदेशीचा नारा देऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले आहे. याला सर्वात पहिला प्रतिसाद भारतीय वायु सेनेने दिला आहे. लष्कराच्या ताफ्यात आता ‘११४ तेजस’ ही हलकी लढाऊ विमाने दाखल होणार आहे. हिंदूस्थान एरॉनॉटिक्स लिमीटेडमध्ये ही विमाने बनणार आहेत.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनी व्हायरसच्या संकटाच्या काळात स्वदेशीचा नारा देऊन आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले आहे. याला सर्वात पहिला प्रतिसाद भारतीय वायू सेनेने दिला आहे. वायू सेनेच्या ताफ्यात आता ११४ तेजस ही हलकी लढाऊ विमाने दाखल होणा आहे. हिंदूस्थान एरॉनॉटिक्स लिमीटेडमध्ये ही विमाने बनणार आहेत.
भारताने दोन वर्षांपूर्वीच लढाऊ विमानांच्या पुरवठ्यासाठी जागतिक पातळीवरून प्रस्ताव मागविले होते. परंतु, हा प्रस्ताव रद्द करण्याता आला आहे. ‘तेजस’च्या माध्यमातून लढाऊ विमानांच्या ताफ्याची क्षमता वाढविण्यात येणार असल्याचे चीफ आॅफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांनी सांगितले आहे. यापूर्वी ४० तेजस विमाने लष्कर घेणार होते. आता आणखी ८३ विमाने घेण्यात येणार आहेत. यामुळे ६ अब्ज डॉलर्सचे परकीय चलन वाचणार आहे. पुढच्या पिढीतील तेजस विमानाची चाचणी उड्डाण 2022 मध्ये होण्याची शक्यता आहे.
बोर्इंग, लॉकहिड मार्टीन कॉर्पोरेशन आणि साब एबी यासारख्या बड्या कंपन्या यासाठी स्पर्धेत होत्या. त्यांना मोठा फटका बसला आहे. तब्बल १५ अब्ज डॉलर्सचा हा प्रस्ताव होता. मात्र, पंतप्रधानांच्या आवाहनानंतर महागडी परदेशी उत्पादने खरेदी करण्यापेक्षा देशी उत्पादने खरेदी करण्यावर लष्कर भर देणार आहे. स्वदेशी मार्गावर जाण्यासाठी संरक्षण मंत्रालय हिंदूस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडची क्षमता वाढविण्यात येणार आहे. त्याचबरोबर जेट दर्जाच्या विमानांच्या निर्मितीमुळे भारत यापुढील काळात संरक्षण निर्यातदार म्हणूनही पुढे येऊ शकतो.
जनरल रावत म्हणाले, भारतीय बनावटीची विमाने उत्कृष्ट दर्जाची आहेत. यामुळे संरक्षण सज्जतेवर कोणताही परिणाम होणार नाही. तुलनेने कमी किंमतीमुळेह्व जेट्सचा समावेश भारताला संरक्षण संरक्षण निर्यातदार म्हणून उदयास येईल. एअरफोर्समध्ये कामकाज सुरू झाल्यावर अनेक देशांना ते विमान खरेदी करण्यात रस असू शकेल. आर्टिलरी गन, हवाई संरक्षण यंत्रणा आणि रडार या सर्व देशी प्रणाली असतील. आपल्या देशात दारूगोळा उत्पादन देखील वाढविणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App