विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने तयार केलेल्या पीएम केअर फंडाविषयी काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलेल्या ट्विटवरून कर्नाटकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
११ मे रोजी ट्विट करण्यात आले होते. याप्रकरणी कर्नाटकातील शिवमोगा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे ट्विटर हॅण्डल सोनिया गांधी चालवत असल्याचा एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रसार रोखण्याबरोबर मदतनिधी उभारण्यासाठी केंद्र सरकारनं पीएम केअर फंड सुरू केला आहे. या फंडात करोनाविरोधात लढण्यासाठी मदत जमा करावी, असे आवाहन केंद्र सरकारने केले होते. त्यानंतर पीएम केअर फंडात जमा झालेल्या पैशावरून काँग्रेसने सरकारवर टीका केली होती. नेमक्या कोणत्या ट्विटवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, हे स्पष्ट झालेले नाही.
कर्नाटकातील वकील प्रवीण के. वी. या व्यक्तीने सोनिया गांधी यांच्याविरुद्ध तक्रार दिली होती. तक्रारीवरून शिवगोमा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ११ मे रोजी काँग्रेस पक्षाच्या ट्विटर हॅण्डलवरून अनेक ट्विट करण्यात आले होते. यात काही ट्विटमधून पीएम केअर फंडात पारदर्शकता नसल्याचा आरोप करण्यात आला होता.
“भाजपाच्या प्रत्येक योजनेप्रमाणे पीएम केअर फंडाबद्दल गोपनीयता बाळगली जात आहे. पीएम केअर फंडाला मदत देणाऱ्या भारतीयांना या निधीतून केलेल्या कामाची माहिती व्हायला नको का?,” असे एक ट्विट करण्यात आले होतं. त्याचबरोबर इतरही ट्विट ११ मे रोजी करण्यात आले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App