नेपाळमधील माओवादी सरकारचे पंतप्रधानही आता चीनी भाषा बोलायला लागले आहेत. चीनी व्हायरससाठी त्यांनी भारताला कारणीभूत ठरविले आहे. भारतातून होणारा कोरोनाचा प्रसार हा चीन आणि इटलीतील विषाणूपेक्षाही अधिक जीवघेणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : नेपाळमधील माओवादी सरकारचे पंतप्रधानही आता चीनी भाषा बोलायला लागले आहेत. चीनी व्हायरससाठी त्यांनी भारताला कारणीभूत ठरविले आहे.
भारतातून होणारा कोरोनाचा प्रसार हा चीन आणि इटलीतील विषाणूपेक्षाही अधिक जीवघेणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भारत आणि नेपाळच्या सीमा वादावरून दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला आहे.
पूर्णपणे चीनच्या कच्छपि लागलेले नेपाळचे माओवादी पंतप्रधान के पी. शर्मा ओली यांनी करोना विषाणूसाठीही भारताला कारणीभूत ठरवले आहे. नेपाळमध्ये वाढत असलेल्या करोनाबाधितांच्या संख्येलाही भारतातून होणारी घुसखोरी कारणीभूत असल्याचा आरोप ओली यांनी केला आहे.
नेपाळमध्ये बुधवापर्यंत करोनाबाधितांची संख्या ४२७ वर पोहोचली आहे. तेथे २ जूनपर्यंत टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. नेपाळमध्ये करोना नव्हताच. मात्र भारतातून करोनाची चाचणी न करताच येणार्या घुसखोरांमुळे नेपाळमधील चीनी व्हायरस बाधितांची संख्या मोठ्या माणात वाढत आहे. हे घुसखोरच कोरोनाचा प्रसार करत असल्याचा आरोप ओली यांनी केला.
नेपाळमध्ये सध्या माओवादी विचाराचे सरकार आहे. चीनकडून त्यांना मोठ्या प्रमाणावर मदत मिळत आहे. माजी पंतप्रधान प्रचंड हे भारतमित्र म्हणून ओळखले जात होते. मात्र, ओली हे चीनच्या ओंजळीनेच पाणी पितात.
विशेष म्हणजे नेपाळला आवश्यक असलेल्या सर्व जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा भारताकडूनच होतो. भारत-नेपाळच्या वादाच्या पार्श्वभूमीवरही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानवतावादी भूमिकेतून हा पुरवठा बंद केलेला नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App