विशेष प्रतिनिधी
मुंबई : वसई-विरार शहरातील नालासोपारा येथे नातेवाईकांकडे राहायला आलेल्या एका जोडप्याच्या 8 महिन्यांच्या बाळाला चीनी विषाणूची लागण झाल्याची धक्कादायक माहिती रविवारी उघडकीस आली. आश्चर्य म्हणजे या बाळाच्या आई वडिलांची तपासणी केल्यावर मात्र या दोघांचे अहवाल निगेटिव्ह आले.
हे जोडपे धारावीतून नालासोपारा पूर्वेच्या परिसराततील नातेवाईकांकडे राहण्यास आले होते. लॉकडाऊन मुळे ते नालासोपार्यात अडकून पडले. वसई विरार महापालिकेच्या आरोग्य विभागाने हे जोडपे धारावीतून आले म्हणून त्यांना त्यांच्या 8 महिन्याच्या बाळासह विलगिकरण कक्षात दाखल केले.त्यावेळी या तिघांची कोविड तपासणी करण्यात आली.
यावेळी आई व वडिल या दोघांचा कोविड रिपोर्ट निगेटीव्ह आला. परंतु त्यांच्या 8 महिन्याच्या बाळाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने सर्वाना धक्का बसला. या रुग्ण बाळास वसई विरार महापालिकेच्या आयसोलेशन वॉर्डमध्ये उपचारासाठी दाखल केले असून त्याच्यावर उपचार चालू आहेत. आई-वडील निगेटिव्ह आणि बाळ पॉझिटिव्ह आल्याने या रूग्ण बाळाला कोरोनाची लागण कधी आणि कोणाकडून झाली, हे शोधले जात आहे.
Array