संपूर्ण देश चीनी व्हायरसची लढतोय. मात्रए कॉंग्रेसला राजकारण करायचे आहे. या पक्षाला मात्र मोदी सरकारवर टीका करण्याशिवाय काहीही दिसत नाही, अशी टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : संपूर्ण देश चीनी व्हायरसची लढतोय. कॉंग्रेसला राजकारण करायचे आहे. या पक्षाला मात्र मोदी सरकारवर टीका करण्याशिवाय काहीही दिसत नाही, अशी टीका केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी ट्वीट करुन मोदी सरकार असंवेदनशील आहे असे म्हटलं होतं. सरकारी कर्मचार्यांचा महागाई भत्ता (डीए) स्थगित केला आहे. अर्थात महागाई भत्त्यात कपात करण्याऐवजी केंद्र सरकारने मेट्रोचा प्रकल्प का स्थगित केला नाही असा प्रश्न राहुल गांधी यांनी विचारला आहे.
गुरुवारी सोनिया गांधी यांनीही मोदींवर निशाणा साधला होता. आता या सगळ्या टीकेला प्रकाश जावडेकर यांनी उत्तर दिलं आहे.
यावर उत्तर देताना ट्विटरवर जावडेकर म्हणाले, सध्याच्या घडीला सगळा देश चीनी व्हायरसच्या संकटाचा सामना करतो आहे. मात्र काँग्रेसला मोदी सरकारवर टीका करण्यातच धन्यता मानतं आहे. सध्या ज्या प्रकारे काँग्रेस नेते वागत आहेत त्याचं उत्तर त्यांना कधीतरी द्यावं लागेल.
सरकारवर टीका करण्याबाबत कॉंग्रेस पक्षाची भूमिका ठरविण्यासाठी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांंच्या अध्यक्षतेखाली सल्लागार गटाची स्थापना करण्यात आली आहे. यावरूनही कॉंग्रेसवर टीका झाली होती. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांच्यासह ११ सदस्य या सल्लागार गटात आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App