मुस्लिम, मुस्लिम भाई-भाई, असा धार्मिक सूर आळवत अफगाणिस्तानातील तालिबान्यांना भारताविरोधात उसकवण्याच्या पाकच्या नापाक इराद्यांना जोरदार हादरा बसला आहे. काश्मिर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे तालिबानने स्पष्ट केले आहे. काश्मिर खोऱ्यातील पाकपुरस्कृत दहशतवादात सहभागी होण्याचेही तालिबान्यांनी साफ नाकारले आहे.
वृत्तसंस्था
काबुल : काश्मीरमधील पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादात सामील होण्याच्या दाव्याचे तालिबानने खंडन केले आहे. काश्मिर हा भारताचा अंतर्गत मुद्दा असून त्यात आम्ही हस्तक्षेप करणार नाही, असे तालिबानने स्पष्ट केल्याने पाकिस्तानच्या नीच इराद्यांना जोरदार झटका बसला आहे.
“काश्मीरमधील जिहादमध्ये सामील होण्यासंदर्भात माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेले विधान चुकीचे आहे. इतर देशांच्या अंतर्गत कामांमध्ये आम्ही हस्तक्षेप करत नाही,” असे अफगाणिस्तानच्या इस्लामिक अमीरातचे प्रवक्ते सुहेल शाहीन यांनी स्पष्ट केले. इस्लामिक अमीरात ही तालिबानचा राजकीय पक्ष आहे. तालिबानला भारताविरोधात वापरण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न आहे. या संदर्भात दिशाभूल करणारी वक्तव्ये समाज माध्यमांमधून गेल्या काही दिवसांपासून प्रसारीत केली जात होती. या पार्श्वभूमीवर तालिबानने केलेले स्पष्टीकरण महत्वाचे आहे.
काश्मीर वाद मिटल्याशिवाय भारताशी मैत्री करणे अशक्य आहे. काबुलमध्ये सत्ता काबीज केल्यावर तालिबान “काश्मीरही काफिरांच्या ताब्यातून मुक्त केला जाईल,” अशी वक्तव्ये जाणीवपूर्वक प्रसारीत केली गेली. मात्र या वक्तव्यांशी तालिबानचा किंवा इस्लामिक अमिरातचा संबंध नाही. ही आमची अधिकृत वक्तव्ये नाहीत, असे तालिबानने स्पष्ट केले आहे. दिशाभूल करणारी वक्तव्ये पाकीस्तानकडून प्रसारीत केली जात असल्याचे लक्षात आल्यानंतर दिल्लीने त्यावर खास लक्ष ठेवत तालिबानशी संपर्क साधला. त्यानंतर तालिबानने स्वतःची भूमिका स्पष्ट केली.
अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तानातून काढता पाय घेण्यास सुरुवात केल्यापासून अफगाणिस्तानातील राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत. यापुर्वी अनेक दशके इस्लामाबादने (पाकिस्तानने) सोव्हिएत-अफगाण युद्धाच्यावेळी अमेरिकेसाठी प्रॉक्सी म्हणून काम केले होते. आता अफगाणी लोकांना अमेरिका आणि पाकिस्तान या दोघांचेही जोखड फेकून द्यायचे आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान चीनच्या मदतीने अमेरिकेला नमवण्याच्या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर भारताने अफगाणिस्तानशी चांगले संबंध राखण्यावर भर दिला आहे. पुर्वीपासून भारताबद्दल आस्था असणारा मोठा वर्ग अफगाणिस्तानात आहे. हे नाते मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न राहिला आहे.
Array