विशेष प्रतिनिधी
मुंबई : भारत आणि जगातील सद्यस्थिती गंभीर आणि चिंतेची आहे. त्यावर त्वरित कारवाई करण्याची गरज आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा समूहाच्या कंपन्यांनी या पूर्वी आवश्यक तेव्हा देशहिताच्या कामात पुढाकार घेतला आहे. या संकटात ही गरज कधी नव्हे इतकी मोठी आहे. या पार्श्वभूमीवर टाटा उद्योगसमुहातर्फे पंधराशे कोटी रुपये कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी देत असल्याचे या समुहाचे अध्यक्ष रतन टाटा यांनी जाहीर केले.
कोविड-19 हे मानवजातीसमोरच्या सर्वात कठीण आव्हानांपैकी एक आहे. या अपवादात्मक अवघड काळात, या संकटाशी लढण्यासाठी आपत्कालीन संसाधने त्वरीत तैनात करणे आवश्यक असल्याचे मला वाटते, असे टाटा यांनी म्हटले आहे.
कोरोना साथीचा मुकाबला करण्यासाठी पंधराशे कोटी रुपये खर्च करण्याचा इरादा टाटा यांनी जाहीर केले. त्यांनी सांगितले, की हे पैसे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना वैयक्तिक संरक्षण उपकरणे उपलब्ध करुन देण्यासाठी, कोरोनावरील उपचारांसाठी आवश्यक श्वसन प्रणालीची उपलब्धता वाढवण्यासाठी, चाचणी कीट घेण्यासाठी तसेच संसर्ग झालेल्या रुग्णांवरील मॉड्यूलर उपचार सुविधांच्या उभारणीसाठी खर्च केले जातील.
It is my appeal to my fellow Indians, Kindly contribute to the PM-CARES Fund. This Fund will also cater to similar distressing situations, if they occur in the times ahead. This link has all important details about the fund. https://t.co/enPvcqCTw2— Narendra Modi (@narendramodi) March 28, 2020
It is my appeal to my fellow Indians, Kindly contribute to the PM-CARES Fund. This Fund will also cater to similar distressing situations, if they occur in the times ahead. This link has all important details about the fund. https://t.co/enPvcqCTw2
आरोग्य कर्मचारी आणि सामान्य लोकांच्या आरोग्यविषयक ज्ञान व्यवस्थापन आणि प्रशिक्षणासाठीही निधी खर्च केला जाईल. समाजातील वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल, असे टाटांनी स्पष्ट केले. कोरोना महामारीच्या विरोधात स्वतःचा जीव धोक्यात घालून लढणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल टाटा यांनी कृतज्ञताही व्यक्त केली आहे
अक्षय कुमारचे २५ कोटी
अभिनेता अक्षय कुमारने २५ कोटींची मदत जाहीर केली आहे. अक्षय कुमारने ट्विट करत सांगितलं आहे की, “आपल्या लोकांसाठी जगण्याची हीच वेळ आहे. त्यासाठी जे काही गरजेचं आहे ते सगळं केलं पाहिजे. मी माझ्याकडील २५ कोटी रुपये पंतप्रधान केअर फंडसाठी देत आहे. चला आयुष्य वाचवू…”.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App