लडाखच्या पूर्व भागात भारत-चीनमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनी सैनिकांची गुंडगिरी सुरू आहे. सीमेवर तणाव निर्माण झाला असून दिल्लीत पंतप्रधानांसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. कोणत्याही सुरक्षा आव्हाानाचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य तयार असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : लडाखच्या पूर्व भागात भारत-चीनमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवर चीनी सैनिकांची गुंडगिरी सुरू आहे. सीमेवर तणाव निर्माण झाला असून दिल्लीत पंतप्रधानांसोबत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. कोणत्याही सुरक्षा आव्हाानाचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य तयार असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्व लडाखमधील बदलत्या स्थितीची माहिती पंतप्रधान मोदींना दिली. मोदींसोबतची ही बैठक आधीपासूनच ठरलेली होती, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पँगोंग लेक, गलवान खोरे, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी येथे दोन्ही देशातील सैनिक आमने-सामने आले आहेत. गेल्या २० दिवसांपासून तिथे तणाव आहे. पेनगोंग त्सो लेक भागात 5 मे रोजी झालेल्या चकमकीच्या वेळी चिनी सैनिकांनी काठी, काटेरी तार आणि दगडांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता, अशी माहितीही या वेळी देण्यात आली होती.
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांचे पूर्व लडाख आणि उत्तर सिक्कीम आणि उत्तरखंडमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील स्थितीवर बारकाईने लक्ष आहे. चीनकडून आलेल्या कोणत्याही दबावाला झुगारून देऊन उत्तर दिले जाईल, असे सांगण्यात आले. या महिन्यात लडाखमध्ये चीन आणि भारतीय सैन्यात तीनवेळा वाद झाला. चीनने नियंत्रण रेषेजवळ (एलएसी) भारतीय भागात घुसखोरी करत तंबू ठोकले आहेत.
चीनने एलएसीजवळ सुमारे 5 हजार सैनित तैनात केले आहेत. प्रत्युत्तरासाठी भारतीय सैन्याने जवानांची संख्या वाढवली आहे. पंतप्रधानांनी मंगळवारी परराष्ट्र सचिवांचीही भेट घेतली होती. त्यांच्यामध्ये चीनच्या रणनितीबाबत चर्चा झाली. त्याचबरोबर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही तीनही सेना प्रमुखांची भेट घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App