चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढत असली तरी आता या आजारावर मात करणाऱ्यांची संख्याही लक्षणीय झाल्याची दिलासादायक बातमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारत आहे आणि सध्या तो 41.61 टक्के झाला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढत असतली तरी आता या आजारावर मात करणाऱ्यांची संख्याही लक्षणिय झाल्याची दिलासादायक बातमी आहे. देशात रुग्ण बरे होण्याचा दर सातत्याने सुधारत आहे आणि सध्या तो 41.61 टक्के झाला आहे.
कोविड-19 आजारातून आतापर्यंत एकूण 60,490 रुग्ण बरे झाले आहेत. देशात या आजारामुळे मृत्यू होणाऱ्यांच्या प्रमाणातही 3.30% (15 एप्रिल रोजी) वरून सध्याच्या 2.87% घट होताना दिसून येत आहे. हे प्रमाण जागतिक स्तरावर कमीत कमी आहे. या आजाराने मृत्यू होणाऱ्यांची जागतिक सरासरी सध्या 6.45% च्या आसपास आहे. दर लाख लोकसंख्येच्यामागे या आजाराने मृत्यू होण्याच्या आकडेवारीच्या विश्लेषणावरून असे दिसून येते की जगात प्रत्येक लाख लोकसंख्येमागे 4.4 मृत्यूचे प्रमाण आहे.
भारतात जगाच्या तुलनेत ते कमी म्हणजे 0.3 प्रति लाख आहे. दर लाख लोकसंख्येच्यामागे असलेले मृत्यूचे प्रमाण आणि मृत्यू दर याची तुलनेने कमी असलेली आकडेवारी ही वेळेवर रुग्ण चिकित्सा करून त्यांचे नैदानिक व्यवस्थापन दर्शविते.
चीनी व्हायरस विरुध्दच्या लढाईत चाचण्या करणे अत्यंत महत्वाचे असते. भारतात दररोज एक लाख १० हजार चाचण्या करण्याची क्षमता निर्माण झाली आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) ही कामगिरी केली आहे.
प्रयोगशाळा, सुधारणा, आरटी-पीसीआर मशीन (वास्तविक वेळ -पॉलिमर चेन रिअक्शन मशीन) आणि मनुष्यबळ वाढवून ही क्षमता वाढविण्यात आली आहे. कोविड -19 बाधित रुग्णांची संख्या तपासण्यासाठी भारताकडे एकूण 612 प्रयोगशाळा आहेत; त्यातील आयसीएमआर अर्थात भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेद्वारे 430 तर खाजगी क्षेत्राद्वारे 182 प्रयोगशाळा चालविल्या जातात. लक्षणे असलेल्या स्थलांतरित मजुरांच्या चाचण्या करण्यासाठी आणि लक्षणे नसलेल्या स्थलांतरित मजुरांना गृह विलगिकरणात ठेवण्यासंदर्भात मार्गदर्शक नियमावली राज्य/केंद्र शासित प्रदेशांना देण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App