गुंतवणुकीला चालना देण्यासाठी पंतप्रधानांचा मंत्र

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनी व्हायरसच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील गुंतवणूकीला चालना देण्याच्या धोरणांबाबत चर्चा करण्यासाठी घेतली सर्वसमावेशक बैठक घेतली. अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जास्तीत जास्त परदेशी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी तसेच स्थानिक गुंतवणूकीला प्रोत्साहन देण्यासंदर्भात विविध उपाययोजना करणार असल्याचे सांगितले.

देशातील विद्यमान औद्योगिक जमीन आणि वसाहतींमध्ये आधीच आवश्यक मंजुऱ्या घेऊन पायाभूत सुविधांना चालना दिली जाणार आहे. वित्तीय सहाय्य पुरवण्यासाठी एक योजना विकसित केली जावी यावर चर्चा करण्यात आली. गुंतवणूकदारांना मार्गदर्शन करण्यासाठी अधिक सक्रिय दृष्टिकोनासह कार्यवाही केली जावी, त्यांच्या अडचणी जाणून घ्याव्यात आणि केंद्र तसेच राज्य सरकारांकडून त्यांना आवश्यक असणाऱ्या मंजुऱ्या कालबद्ध रीतीने मिळाव्यात यासाठी मदत करण्याचे निर्देश या बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी दिले.

जलद मागार्ने भारतात गुंतवणूक आणण्यासाठी आणि भारतीय देशांतर्गत क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी विविध धोरणांवर चर्चा झाली. गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी रणनीती विकसित करणे आणि अधिक कार्यक्षम बनण्यासाठी राज्यांना मार्गदर्शन करण्याबाबत विस्तृत चर्चा झाली. विविध मंत्रालयांद्वारे हाती घेण्यात आलेले सुधारणा उपक्रम त्याच गतीने चालू राहावेत आणि गुंतवणूक तसेच औद्योगिक विकासाच्या प्रोत्साहनाला विलंब करणारे अडथळे दूर करण्यासाठी कालबद्ध रीतीने कार्यवाही केली जावी यावरही चर्चा झाली. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, अर्थमंत्री निर्मला सितारामन आणि केंद्र सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात