संपूर्ण देश कोरोना व्हायरसविरुध्द लढत असताना दिल्ली सरकारने माहिती मिळूनही कागदी घोडेच नाचविल्याचे दिसून आले आहे. ‘तबलिगी मरकज’मुळे संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. अंदमान- निकोबार सरकारने २५ मार्च रोजीच मरकजमध्ये सहभागी झालेल्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे कळविले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
अभिजित विश्वनाथ
नवी दिल्ली : संपूर्ण देश कोरोना व्हायरसविरुध्द लढत असताना दिल्ली सरकारने माहिती मिळूनही कागदी घोडेच नाचविल्याचे दिसून आले आहे. तबलिगी मरकजमुळे संपूर्ण देशात कोरोना व्हायरसचा प्रसार झाला आहे. अंदमान- निकोबार सरकारने २५ मार्च रोजीच मरकजमध्ये सहभागी झालेल्यांना कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे कळविले होते. मात्र, त्यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
देशावर कोरोनाचे संकट आले असताना दिल्लीतील अरविंद केजरीवाल सरकार चुकांवर चुका करत आहे. लॉकडाऊनच्या घोषनेनंतर दिल्लीतील कष्टकर्यांना सरकार विश्वास देऊ शकले नाही. त्यामुळे हजारो कष्टकर्यांनी रस्त्यावर गर्दी करत आपल्या गावी स्थलांतर केले. त्यामुळे उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, राजस्थानातील ग्रामीण भागातही कोरोना व्हायरसचा धोका निर्माण झाला आहे. दुसरी चूक आता तबलिगी मरकजच्या प्रकरणात केली आहे. लॉकडाऊन सुरू असताना हजारांहून अधिक लोक धार्मिक कार्यक्रमात सहभागी झाले होते. मात्र, याची खबर केजरीवाल सरकारला नव्हती. नेहमीप्रमाणेच दिल्लीतील पोलीस यंत्रणा आपल्या अखत्यारित नाही, असे म्हणून केजरीवाल आपली जबाबदारी झटकतील. पण राज्यात साथरोग प्रतिबंधक अधिनियम लागू केलेला असताना दिल्लीतील आरोग्य विभाग काय करत होता? हा प्रश्न उपस्थित होतो.
पण त्यापेक्षाही गंभीर म्हणजे अंदमान निकोबार प्रशासनाने पाठविलेल्या पत्रावर दिल्ली सरकारने काहीही कारवाई केली नाही. तबलिकी मरकजमध्ये सहभागी झालेल्या १० जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. हे दिल्ली सरकारला कळविण्यातही आले होते. मात्र, आरोग्य मंत्र्यांनी त्याची दखल घेतली नाही.
जगातील अनेक देशांत तबलिकी मरकजमधून कोरोना व्हायरसचा प्रसार झाल्याच्या बातम्या होत्या. विविध देशांतून आकडेवारी येत होती. अगदी आपल्या शेजारच्या पाकिस्तानमध्येही येथूनच प्रसार झाल्याचे सांगण्यात आले होते. जगातील तबलिकी मरकजचे मुख्यालय दिल्लीतील निजामुद्दीनमध्ये आहे. त्यामुळे केजरीवाल सरकारने त्यावर लक्ष ठेवणे गरजेचे होते.
‘मरकज’ या शब्दाचा अर्थ सामूहिक बैठक किंवा केंद्र असा होतो. ‘तबलिक’चा अर्थ अल्लाह आणि कुराण , हदीसमधील तत्वज्ञान दुसर्यांपर्यंत पोहोचविणे. जमात याचा याचा अर्थ समूह किंवा ग्रुप असता होतो. ७५ वर्षांपूर्वी मेवातचे मौलाना इलियास यांनी मरकजची स्थापना केली. त्यामागील उद्देश भारतातील निरक्षर मुस्लिमाांना इस्लामच्या वाटेवर आणणे. नमाज पढण्यासाठी त्यांना प्रेरीत करणे. रोजे ठेवणे, वाईट गोष्टींचा त्याग करणे, सत्याची कास धरण्याचे शिक्षण देणे. या कामामुळे मरकजला खूप प्रसिध्दी मिळाली. पूर्ण जगात त्याचे नाव पोहोचले. संपूर्ण जगातून लोक येथे येऊ लागले. त्यांना पारंपरिक व प्राचिन इस्लामिक परंपरा पाळणे, त्या जपणे, त्यांचा प्रसार करणे- हेच या समूहाचे काम असते. मुस्लिम धर्माच्या अनुयायांमध्ये इस्लामचा प्रचार-प्रसार करण्यासाठी हा समूह काम करतो. येथे इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, बांगलादेशातील धर्मप्रचारकांचा सदैव राबता असतो.
मरकजमध्ये प्रमुखाने दिलेल्या आदेशानुसार देश-विदेशातील कानाकोपर्यातील मशिदींमध्ये जाऊन इस्लामचा प्रसार केला जातो. यासाठी त्या प्रदेशानुसार कमीटी बनविली जाते. आपल्या प्रदेशात भ्रमण करत लोकांना उपदेश करण्याचे काम येथून गेलेले करतात. त्याचबरोबर नवीन सदस्यांना आंपल्यामध्ये सहभागी करून घेण्याचे कामही ते करतात. त्यामुळे मरकजमध्ये सहभागी झालेले देशातील अनेक मशिदींमध्ये गेल्याचीही भीती आहे. सरकारच्या आकडेवारीनुसार २२ मार्चला लॉकडाऊनची घोषणा झाली तेव्हा येथे १,५०० पेक्षा जास्त लोक होते. लॉकडाऊनमुळे हे लोक अडकले हे एकवेळ मान्य केले तरी १ मार्चपासून येथे कार्यक्रम सुरू होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊनची घोषणा करण्याअगोदरपासूनच दिल्लीमध्ये कोरोना व्हायरस रोखण्यासाठी उपाययोजना लागू होत्या. त्यातही धक्कादायक म्हणजे परदेशातून आलेल्या भारतीयांना क्वारंटाईन केले जात असताना परदेशातून १५ मार्चपर्यंत येथे अनेक जण आले होते. त्यांच्याबाबत दिल्ली सरकारने काहीही केले नाही.
निजामुद्दीन तबलिगी मरकजमध्ये दीड हजार जणांचे वास्तव्य १ मार्चपासून होते. पुढचे पंधरा दिवस येथे लोक येतच होते. पंधरा दिवसांमध्ये याठिकाणी १५ हजारांपेक्षा जास्त लोक जमले होते. दिल्ली सरकारच्या नाकाखाली हे सर्व सुरू असताना त्याची माहितीच त्यांना नव्हती. पाचपेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यावर बंदी असताना दीड हजार जण याठिकाणी राहिलेच कसे, हा प्रश्न आहे. तेलंगणामध्ये काही जणांचा मृत्यू झाल्यावर दिल्ली पोलीस निजामुद्दीन मरकजमध्ये पोहोचले. तेथे इमारतीत एका खोलीत १० ते १५ जण राहत असल्याचे त्यांना दिसून आले. त्यात काही विदेशी नागरिकदेखील होते. यामध्ये मलेशिया २०, अफगाणिस्तान १, म्यानमार ३३, अल्जेरिया १, किरगिस्तान २८, इंडोनेशियात ७२, थायलँड ७१, श्रीलंका ३४, बांगलादेश १९, इंग्लंड ३, सिंगापूर १, फिजी ४, फ्रान्स १ आणि कुवैतहून २ या प्रमाणे लोक आले होते. खोलीतील चार-पाच जणांना सर्दी, खोकल्यासारखे आजार होते. पोलिसांनी युद्धपातळीवर प्रयत्न करून त्या सर्वांना रुग्णालयात दाखल केले. येथील धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले अनेक जण अंदमान, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा, केरळ, आंध्र प्रदेश या आपल्या गृहराज्यात लॉकडाऊनची घोषणा होण्याआधी पोहोचले होते. महाराष्ट्रातून १०९ लोक, मध्यप्रदेश १०७, अंदमान २१, आसाम २१६, बिहार ८६, हरयाणा २२, हिमाचल १५, हैदराबाद ५५, कर्नाटक ४५, केरळ १५, मेघालय ५, ओडिशा १५, पंजाब ९, राजस्थान १९, रांची ४६, तामिळनाडू ५०१, उत्तराखंड ३४, उत्तर प्रदेश १५६, पश्चिम बंगाल ७३ आणि विदेशातून २८१ असे एकूण १८३० जण बाहेरून आले होते. केजरीवाल यांनी अगोदरच अंदमान निकोबार प्रशासनाचा इशारा पाळला असता तर कदाचित आज या सगळ्या राज्यांना कोरोना व्हायरसचा सर्वात मोठा धोका निर्माण झाला नसता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App