कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना कोणी गांभिर्याने का घेत नाही याचे कारण समोर आले आहे. ‘न्यू इंडिया का सच’ म्हणून त्यांनी ट्विट केलेला एक फोटो नेपाळमधील असून आठ वर्षांपूर्वीचा असल्याचेही उघड झाले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : कॉंग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांना कोणी गांभिर्याने का घेत नाही याचे कारण समोर आले आहे. ‘ न्यू इंडिया का सच’ म्हणून त्यांनी ट्विट केलेला एक फोटो नेपाळमधील आठ वर्षांपूर्वीचा असल्याचे उघड झाले आहे.
कॉंग्रेसकडून मोदी सरकारची बदनामी करण्यासाठी अनेक खोट्या गोष्टी पसरविल्या जात आहेत. १८ मे रोजी सुरजेवाला यांनी एक फोटो ट्विट केला होता. यामध्ये एक महिला सायकलवर आपल्या मुलाला ओढणीने पाठीवर बांधून चालली होती. हाच फोटो न्यू इंडिया का सच म्हणून सुरजेवाला यांनी टाकला होता. यामध्ये त्यांनी देशात मजुरांना घरी परतत असताना काय हाल सहन करावे लागत आहेत, हे दाखविण्याचा प्रयत्न केला होता.
मात्र, काही नेटकऱ्यांनी इंटरनेटवर शोधाशोध केल्यावर तो नेपाळमधील असल्याचे दिसून आले. तो देखील आठ वर्षांपूर्वीचा असल्याचे सिध्द झाले. यामुळे नेटकऱ्यांनी सुरजेवालांवर टीकेचा वर्षाव केला आहे. त्यानंतर सुरजेवाला यांनी हा फोटो डिलीट केला.
वास्तविक हा फोटो आठ वर्षांपूर्वी नेपाळ येथील फोटोग्राफर नरेंद्र श्रेष्ठा यांनी काढला होता. सायकलवर जाणारी महिलाही नेपाळी आहे. प्रेस इन्फॉरर्मेशन ब्युरोनेही हा फोटो फेक असल्याचे म्हटले आहे.
कॉंग्रेसकडून मजुरांच्या स्थलांतराबाबत कशा पध्दतीने अपप्रचार केला जात आहे, हे देखील उघड झाले आहे. कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहूल गांधी यांच्यामुळेच सुरजेवाला यांच्यासारख्या खोटारड्या माणसाला प्रोत्साहन मिळत आहे. राहूल गांधी यांनीही त्याचा धडा घेऊन आपले खोटे इंटरव्हयू बंद करावेत, असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App