पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेला लॉकडाऊनचा निर्णय सर्वाधिक प्रशंसनीय निर्णय आहे. यामुळे चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठी तयारी करायला वेळ मिळाला. केंद्र सरकारने अनेक चांगल्या गाईडलाईन्स बनविल्याने चीनी व्हायरसला रोखण्यात यश मिळाले अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेला लॉकडाऊनचा निर्णय सर्वाधिक प्रशंसनीय निर्णय आहे. यामुळे चीनी व्हायरसविरुध्द लढण्यासाठी तयारी करायला वेळ मिळाला. केंद्र सरकारने अनेक चांगल्या गाईडलाईन्स बनविल्याने चीनी व्हायरसला रोखण्यात यश मिळाले अशा शब्दांत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊनच्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
देशातील लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरू होताना केंद्र सरकारने काही भागात सवलतीही जाहीर केल्या आहेत. मात्र, दिशाहिन विरोधक दोन्ही बाजूंनी बोलत लॉकडाऊनवरून केंद्र सरकारसवर टीका करत आहेत. मात्र, केजरीवाल यांनी त्यांची तोंडे बंद केली आहेत. ते म्हणाले, देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे आपल्याला तयारी करायला वेळ मिळाला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. त्यामुळेच महामारीच्या या अनपेक्षित संकटाशी मुकाबला करणे शक्य झाले आहे.
लॉकडाऊनमुळे चीनी व्हायरसचा पूर्णपणे नायनाट होणार नाही. त्यासाठी सर्वांना एकत्र यावे लागेल. देशात प्रत्येक ठिकाणी सारखीच तयारी करावी लागेल. चांगल्यात चांगली रुग्णालये आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्या लागतील, असे सांगुन केजरीवाल म्हणाले, अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्यासाठी केंद्र सरकारला अनेक उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी राज्यांकडून पूर्ण सहकार्य मिळण्याची गरज आहे.
गेल्या ७० वर्षांत देशात आरोग्य सुविधा निर्माण करण्यात ज्या चुका झाल्या त्याची फळे आपण भोगत आहोत. चीनी व्हायरसने आपले डोळे उघडले आहेत. यासाठी आता वैद्यकीय संशोधनाला महत्व द्यायला हवे, असेही केजरीवाल यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App