चीनी विषाणू विरुद्धच्या लढ्यात लक्षणीय यश मिळवता न आल्याने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचं प्रशासकीय अपयश उघडं पडू लागलं आहे. या विरोधात बंगाली जनतेत रोष उत्पन्न होऊ लागला आहे, पण दहशतीमुळं कोणी बोलत नाही. या पार्श्वभूमीवर केंद्राला असहकार करत राज्यातली स्थिती लपवून ठेवण्याचा ममतांचा प्रयत्न चालूच आहे. मात्र यात नुकसान बंगाली जनतेचे होत आहे. त्यामुळेच परिस्थिती हाताबाहेर जाण्याआधीच केंद्राने स्वतःच पश्चिम बंगालात लक्ष घालण्याचे ठरवले आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा केंद्राविरोधातील थयथयाट चालूच आहे. चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव लपविण्यासाठी शक्य तेवढे प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहेत. त्यामुळे पश्चिम बंगालमधील रुग्णांची संख्या शोधण्यासाठी आता केंद्राने खास तयारी केली आहे. यासाठी आयसीएमआर आणि एनआयसी यांनी एक अॅप बनविले असून सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांंना ते देण्यात येणार आहे. त्यामुळे केंद्राला माहिती मिळणे शक्य होणार आहे. त्यानुसार उपाययोजना केली जाणार आहे.
आरटी-पीसीआर अॅप नावाने तयार करण्यात आलेले हे अॅप थेट सॅँपल गोळा करणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे. या कर्मचाऱ्यांकडून सॅंपल पाठवून आयसीएमआरकडे अहवाल मागविला जातो. सध्या चाचणीचे अहवाल राज्य सरकारच्या अखत्यारीत आहेत. मात्र, या अॅपमुळे केंद्रालाही त्याची माहिती त्याच वेळी उपलब्ध होणार आहे.
पश्चिम बंगालमध्ये गेलेल्या केंद्रीय पथकाला येथील चीनी व्हायरसच्या संकटावर पुरेशा गांभिर्याने काम होत नसल्याचे आढळून आले होते. सरकार याबाबत पारदर्शकपणे काम करत नाही. रुग्णांचा आकडे लपवित असल्याचे त्यांनी म्हटले होते. आरटी पीसीआर अॅपमुळे रुग्णांची डाटा एंट्री करणे सोपे होणार आहे. त्यामुळे अद्ययावत अहवाल प्राप्त होणार आहेत.
केंद्र सरकारने संपूर्ण देशातील जिल्हावार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनची यादी तयार केली आहे. मात्र, ही यादी मानण्यास ममतांनी नकार दिला आहे. केंद्र सरकारने चीनी व्हायरसच्या उद्रेकानुसार रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोन घोषित केले होते. यामध्ये पश्चिम बंगालमधील १० जिल्ह्यांचा समावेश होता. मात्र, ममता बॅनर्जी यांच्या सरकारने आपल्या राज्यात १० रेड झोन नसून चारच आहेत, असे म्हटले आहे.
आजाराविरुध्द लढण्याऐवजी ममता आत्मघातकीपणे आकडा लपवित आहे. त्यामुळे येथे मोठा भडका उडून संपूर्ण राज्य चीनी व्हायरसच्या विळख्यात सापडण्याची भीती आहे. पश्चिम बंगालच्या जनतेला वाचविण्यासाठी केंद्रालाच पावले उचलण्याची गरज आहे. त्यासाठी हे अॅप उपयोगी पडणार आहे
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App