विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : “पंडीत नेहरूंची हॉस्पिटल चालू आणि मोदींनी बांधलेला पुतळा बंद,” असा प्रचार सोशल मीडियातून पसरवला जात आहे. हा अपप्रचार आहे, की कसे, हे समजून घेण्यासाठी काही तथ्य पडताळून पाहणे आवश्यक आहे.
स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत नेहरु 1947 ते 1964 असे सुमारे साडे सतरा वर्षे देशाचे नेतृत्त्व करीत होते. हा कालावधी आजवर देशात झालेल्या कोणत्याही पंतप्रधानांपेक्षा सर्वाधिक आहे. या दीर्घ कालावधीत देश उभारणीच्या टप्प्यावर असल्याने अनेक आव्हाने जशी होती त्याच प्रमाणे संपूर्ण राजकीय स्थेर्य आणि अमर्याद अधिकारही नेहरूंना मिळाले. त्याचा नेहरूंनी देशाच्या भल्यासाठी उपयोग केला.
ऑल इंडिया इन्स्टिट्यूट्स ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS-एम्स) ची उभारणी हा त्यापैकी एक भाग. नवी दिल्लीत 1956 मध्ये ते उभे राहिले. त्यानंतर अपवाद वगळता दीर्घकाळ कॉंग्रेसच्या पंतप्रधानांनी देशाची सूत्रे सांभाळली. मात्र त्यांच्या काळात ‘एम्स’चा विस्तार होऊ शकला नाही.
मोदींच्या काळात काय झाले? नरेंद्र मोदी 2014 मध्ये पहिल्यांदा पंतप्रधान झाले. मात्र पहिल्या टर्ममध्ये मोदींकडे बहुमत नव्हते. 2019 मध्ये मोदी पूर्ण बहुमताने सत्तेत आले. 2014 ते 2020 ही सहा वर्षे मोदी पंतप्रधान आहेत. मात्र या सहाही वर्षांत मोदींना राज्यसभेत बहुमत नाही. या कालावधीत मोदींनी किती ‘एम्स’ची उभारणी केली?
याचे उत्तर आहे – मंगलगिरी, नागपूर (2018), गोरखपूर, भटिंडा, बीबीनगर, कल्याणी, देवघर (2019) या सात ठिकाणी काम सुरु झाले. आसाम, जम्मू-काश्मीर, बिहार या दुर्लक्षित राज्यांसह तामिळनाडू, गुजरात या राज्यांमध्ये ‘एम्स’च्या धर्तीवर आरोग्य केंद्रे उभारण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला. सर्वात महत्वाचे म्हणजे लोकसंख्येच्या प्रमाणात डॉक्टरांचे प्रमाण देशात अत्यंत विषम आहे. डॉक्टरांची संख्या वाढवण्यासाठी मोदी सरकारने देशातल्या प्रत्येक जिल्ह्यात एक वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्याचा निर्णय घेतला.
एवढेच नव्हे तर ही महाविद्यालये सुरु होण्यासही सुरुवात झाली. खासगी वैद्यकीय महाविद्यालयांच्या उभारणीतले निर्बंधही कमी केले गेले. सर्वात महत्वाचे म्हणजे वैद्यकीय प्रवेशातली दुकानदारी रोखण्यासाठी ‘मैनेजमेंट कोटा’ ही प्रथाच काढून टाकली. यामुळे केवळ गुणवत्तेच्या आधारे सर्वसाधारण कुटुंबातील विद्यार्थीही डॉक्टर होण्याचे स्वप्न आता पूर्ण करु शकतो.
सरदार स्मारक बंद का? कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जगभरातली सरकारे आणि वैद्यकीय तज्ञ सार्वजनिक संपर्क पूर्णत: थांबवण्याचा आग्रह धरत आहेत. याचाच भाग म्हणून पर्यटन स्थळे, चित्रपट-नाट्यगृहे, उद्याने आदी गर्दी होऊ शकणारी ठिकाणे बंद केली जात आहेत. कोरोनचा उद्रेक ज्या देशातून जगभर केला त्या चीनमध्ये तर लोकांना त्यांच्या घरात जवळपास कैद करुन ठेवण्यात आले आहे. व्यक्तीगत स्वातंत्र्यासाठी प्रचंड आग्रही असणार्या युरोपीय देशांमध्येही अनेक शहरे ‘लॉक डाऊन’ झाली आहेत. विशेष म्हणजे त्या-त्या देशातले नागरिक या सर्व उपायांना गांभीर्याने प्रतिसाद देत आहेत, कारण ‘कोरोना’च्या संसर्गाचा वेग प्रचंड आहे.
भारतासारख्या दाट लोकवस्तीच्या शहरांमध्ये अद्याप परिस्थिती आटोक्यात आहे. याबद्दल जगाने कौतुक केले आहे. मात्र कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी आगामी पंधरवडा महत्वाचा आहे. या कालावधीत सार्वजनिक संचारबंदी जितकी पाळली जाईल, तितका धोका कमी राहणार आहे. गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल स्मारक बंद आहे ते याचसाठी. त्याच वेळी पंडीत नेहरु आणि नरेंद्र मोदी या दोन्ही आजी-माजी पंतप्रधानांनी चालू केलेली रुग्णालये नागरिकांसाठी अविरत कार्यरत आहेत.
पंतप्रधानांच्या काळात किती मेडीकल कॉलेजची स्थापना झाली..?
1947 च्या अगोदर 20 कॉलेज
1) जवाहरलाल नेहरू : 17 वर्षांच्या काळात 51
2) लालबहादूर शास्त्री : 2 वर्षांत 8
3) इंदिरा गांधी : 15 वर्षांत 21
4) राजीव गांधी : 5 वर्षात 5
5) नरसिंह राव : 5 वर्षांत 6
6) अटलबिहारी वाजपेयी : 6 वर्षात 13
7) मनमोहनसिंग : 10 वर्षात 49
8) नरेंद्र मोदी : 6 वर्षांत 80
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App