हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरूंगात कैद असलेल्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी माजी गुप्तहेर प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मागच्या दाराने प्रयत्न केला होते. मानवीय आधारावर सुटकेची बोलणी झाली होती. मात्र, पाकिस्तानने हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविल्याने दुर्देवाने जाधव यांची सुटका होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी केला आहे.
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरूंगात कैद असलेल्या भारतीय नौदलाचे माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी माजी गुप्तहेर प्रमुख आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी मागच्या दाराने प्रयत्न केला होते. मानवीय आधारावर सुटकेची बोलणी झाली होती.
मात्र, पाकिस्तानने हा मुद्दा प्रतिष्ठेचा बनविल्याने दुर्देवाने जाधव यांची सुटका होऊ शकली नाही, असा गौप्यस्फोट ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांनी केला आहे.
आंतरराष्ट्रीय न्यायालयात (आयसीजे) कुलभूषण यांच्या वतीने माजी सॉलिसिटर जनरल आणि ज्येष्ठ वकील हरीश साळवे बाजू मांडत आहेत. अखिल भारतीय वकिल परिषदेतर्फे आयोजित केलेल्या एका आॅनलाइन संवादात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बोलताना त्यांनी डोवाल यांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.
साळवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारत सरकारने पाकिस्तानशी ‘बॅक डोअर’ चर्चा केली होती. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (एनएसए) अजित डोभाल यांनी स्वत: पाकिस्तानमध्ये समकक्ष नासिर खान जांजुआ यांच्याशी चर्चा केली होती. मात्र हे संभाषण अपूर्ण राहिले
साळवे म्हणाले की, आम्हाला आशा होती की, पाकिस्तानशी ‘बॅक डोअर’ चर्चा केल्यानंतर त्यांना यासाठी तयार करू. आम्ही मानवतावादी कारणावरून जाधव यांच्या सुटकेविषयी बोलत होतो. परंतु असे घडले नाही.
पाकिस्तानाने याबाबत कोणतेही पाऊल उचलले नाही. एफआयआरची प्रत आणि चार्जशीटची प्रत देखील दिली नाही. वारंवार सांगूनही पाकिस्तानकडून कोणताही पुरावा दिला जात नाही. अशा परिस्थितीत आता आपण पुन्हा आयसीजेला जावे की नाही याचा विचार करत आहोत.
पाकिस्तानने मार्च 2016 मध्ये कुलभूषण जाधव यांना अटक केली होती. 2017 मध्ये त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. यादरम्यान, कुलभूषण यांना सुनावणीत आपले म्हणणे मांडण्यासाठी कोणता सल्लागारही दिला नव्हता. याविरोधात भारताने 2017 मध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा दार ठोठावले. आयसीजेने जुलै 2019 मध्ये पाकिस्तानला जाधव यांना फाशी न देण्याचा आणि शिक्षेवर पुनर्विचार करण्याचा आदेश दिला. त्यानंतर आतापर्यंत पाकिस्तानने यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही.
डोवाल यांनी भारतीय गुप्तचर संस्थेत काम केले आहे. तब्बल सात वर्षे ते पाकिस्तानात होते. इंटेलिजन्स ब्युरोचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. त्यामुळे त्यांचे पाकिस्तानातील उच्च वर्तुळात चांगले संबंध आहेत. त्यामुळेच त्यांनी मानवीय भूमिकेतून जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न केले होते.
Array