अंबानींच्या श्रीमंत रिलायन्समध्येही आता पगार कपात

वृत्तसंस्था

मुंबई : देशातल्या सर्वात श्रीमंत कंपन्यांपैकी एक असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने त्यांच्या हायड्रोकार्बन विभागातील काही कर्मचार्‍यांच्या पगारात दहा टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनी विषाणूच्या प्रादुर्भावामुळे व्यवसायावर परिणाम झाला. त्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे. कंपनीच्या संचालक मंडळाच्या पगारातही 30 ते 50 टक्के कपात करण्यात आली आहे.

ज्यांचा वार्षिक पगार पंधरा लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, त्यांनाच ही पगार कपात लागू होईल. त्यापेक्षा कमी पगार असणाऱ्यांचा पगार कमी होणार नाही. पेट्रोकेमिकल्सची मागणी कमी झाल्याने हायड्रोकार्बन व्यवसायावर परिणाम झाला आहे. त्यामुळे ही वेतन कपात केल्याचे कंपनीने म्हटले आहे.

कंपनीने म्हटले आहे की, आर्थिक आणि व्यवसाय वातावरणाचे बारकाईने निरीक्षण केले जाईल. त्यानंतर या कपातीच्या निर्णयाचा पुन्हा विचार केला जाईल. वार्षिक रोख बोनस आणि कामगिरीशी निगडीत प्रोत्साहन भत्ते साधारणपणे वर्षाच्या पहिल्या तिमाहीत दिले जातात. मात्र यावर आता निर्बंध आलेत. रिलायन्सच्या इतर कंपन्यांवर परिणाम झाला की नाही हे त्वरित स्पष्ट झाले नसल्याचे रॉयटर्सने सांगितले आहे, परंतु तीन सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की कंपनीच्या दूरसंचार युनिट रिलायन्स जिओ इन्फोकॉमवर गुरुवारपर्यंत काही परिणाम झाला नाही.

मार्च महिन्यात भारतातील क्रूड प्रोसेसिंग एक वर्षाच्या तुलनेत 5..7 टक्क्यांनी घसरले आहे. सप्टेंबरनंतरची ही सर्वात मोठी घसरण आहे. चिनी विषाणूच्या संकटामुळे आणि प्रवासाला असलेल्या निर्बंधामुळे इंधनाची मागणी घटली. त्यामुळे रिफायनरीजना उत्पादन कमी करणे भाग पडले आहे. रिलायन्सने आपल्या देशांतर्गत बाजारपेठांवर केंद्रित असलेल्या कच्च्या प्रक्रियेमध्ये 6 टक्क्यांनी वाढ केली आहे.

गेल्या वर्षीच्या याच महिन्याच्या तुलनेत मार्च महिन्यात निर्यातीवर लक्ष केंद्रित केलेल्या तेल उत्पादनातील तेल क्षेत्रातील उत्पादन 24 टक्क्यांनी कमी केले आहे. रिलायन्सच्या डिजिटल आर्ममध्ये 9.99 टक्के हिस्सा खरेदी करण्यासाठी फेसबुकने या महिन्यात 5.7 अब्ज डॉलर्स खर्च करण्याची योजना उघड केली. दरम्यान, आता रिलायन्सचे पगार कमी केल्याच्या बातमीमुळे इतर कंपन्यांही याचे अनुकरण करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कुबेर समजल्या जाणाऱ्या अंबानींचा पगार कमी होणार असेल तर इतरांचे काय, अशी प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात