संरक्षणमंत्र्यांचा विश्वास, भारताच्या अभिमानाला धक्का लागू देणार नाही


भारत आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध राखू इच्छितो. कायमच ही भूमिका राहिली आहे. मात्र, भारताच्या अभिमानाला कोणत्याही परिस्थिती धक्का लागू देणार नाही, याबाबत सर्वांना आश्वस्त करतो, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : भारत आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध राखू इच्छितो. कायमच ही भूमिका राहिली आहे. मात्र, भारताच्या अभिमानाला कोणत्याही परिस्थिती धक्का लागू देणार नाही, याबाबत सर्वांना आश्वस्त करतो, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले आहे. भारत आणि चीनच्या सीमेवर सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह बोलत होते.

ते म्हणाले, शेजाऱ्यांशी सौहार्दाचे संबंध ठेवण्याचे भारताचे नेहमी धोरण राहिले आहे. परंतु, चीनसोबत अनेकदा समस्या निर्माण होतात. पूर्वीही असे झालेले आहे. परंतु, याबाबत राजनैतिक स्तरावर बोलणी चालू आहे. परंतु, हे करताना भारताच्या अभिमानाला कोणत्याही प्रकारे धक्का लागू देणार नाही.

भारत आणि चीनमध्ये बोलणीची एक पध्दत आहे. याच पध्दतीने लष्कर आणि राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. त्यातून निश्चितच मार्ग निघेल. मात्र, त्यासाठी कोणत्याही मध्यस्तीची गरज नाही.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर मध्यस्तीची तयारी दर्शविली होती. मात्र, परराष्ट्र मंत्रालयाने ही शक्यता फेटाळून लावली आहे.

राजनाथ सिंह यांनी सांगितले की, अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क एस्पर यांनीही शुक्रवारी फोन केला होता. मात्र, त्यांनाही मध्यस्थीची गरज नसून भारत-चीन यांच्यात बोलणी सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. चीननेही या तणावाला चर्चेच्या माध्यमातून सोडविण्याची तयारी दर्शविली आहे. भारतही हे प्रकरण जास्त चिघळू नये या मताचा आहे. त्यामुळे यावर निश्चित मार्ग निघेल.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण