संबित पात्रांवर एफआयआर, तरीही म्हणतात भ्रष्ट गांधी परिवाराचा पर्दाफाश करतच राहणार


गुन्हा दाखल होणे माझ्यासाठी प्रोत्साहनच आहे. भ्रष्ट नकली गांधी परिवाराचा पर्दाफाश केल्याने माझ्यावर एफआयआर दाखल केला आहे. आता मी रोज गांधी परिवाराच्या नव्या अध्यायाचा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणार असल्याचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे.


विशेष प्रतिनिधी

पुणे : गुन्हा दाखल होणे माझ्यासाठी प्रोत्साहनच आहे. भ्रष्ट नकली गांधी परिवाराचा पर्दाफाश केल्याने माझ्यावर एफआयआर दाखल केला आहे. आता मी रोज गांधी परिवाराच्या नव्या अध्यायाचा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करणा असल्याचे भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी म्हटले आहे.

संबित पात्रा यांच्याविरोधात छत्तीसगडमधील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यावर त्यांनी कडक शब्दांत उत्तर दिले आहे. यासदंर्भातील ट्वीटमध्ये ते म्हणतात, राजीव गांधी यांना १९८४ च्या शिख कत्तलीसाठी जबाबदार ठरविणे खरोखरच अवमानजनक आहे? हे तर वास्तव आहे. वास्तव मांडणे म्हणजे अवमान करणे नसते.

कॉंग्रेसींनी हे लक्षात ठेवावे की ही इंदिरा गांधी यांची आणिबाणी नाही. त्यामुळे तुमच्या या एफआयआरने काहीही होणार नाही. एक मात्र होईल की त्यामुळे गांधी परिवार पूर्णपणे एक्सपोझ होईल.

यापूर्वी पात्रा यांनी ट्विट करून माजी पंतप्रधान पंडीत नेहरू आणि राजीव गांधी यांच्यावर वादग्रस्त विधान केले होते.

या ट्विटमध्ये काश्मीर प्रश्नासाठी नेहरूंना तर १९८४ च्या शिख कत्तलीसाठी राजीव गांधींना जबाबदार धरले होते. नेहरूंनी काश्मीर समस्या निर्माण केली. नेहरू नसते तर काश्मीरचा प्रश्नच निर्माण झाला नसता. राजीव गांधी यांनी बोफोर्समध्ये चोरी केली. ३ हजार शिखांचे हत्याकांडही घडविले, असे पात्रा म्हणाले होते.

आपल्या दुसर्या ट्विटमध्ये गांधी परिवाराला त्यांनी इशारा दिला आहे. दररोज एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा पर्दाफाश करणार आहे. आपण सर्वांनी मिळून कोणकोणते घोटाळे करून या परिवाराने देशाला लुटले आहे, याचा पर्दाफाश करू असेही त्यांनी म्हटले आहे.
पात्रा यांच्याविरोधात छत्तीसगड युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष पूर्णचंद्र पाधी यांच्या तक्रारीवरून रायपूरच्या सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात