लडाखमध्ये चीनला मिळतेय डोकलामपेक्षा खणखणीत उत्तर


  • लडाखमध्ये चीनचे ५ हजार सैनिक तैनात; भारतीय सैनिकांची stratagic position मजबूत
  • भारताने रस्ते बांधणीचा वेग आणि कुमक वाढविल्याने चीनची पोटदुखी

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषे (LAC) जवळ चीनने संघर्षाची भूमिका घेतली असताना भारतीय सैन्यही तितक्याच आक्रमकतेने चीनी सैन्याला प्रत्युत्तर देत आहे. चीनने लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ पाच हजारांचे सैन्य केले तैनात करताच भारतानेही सैन्याची कुमक वाढवून strategic positions वर आपली पकड मजबूत केली आहे. भारत – भूतान सीमेवरील डोकलाममध्ये झालेल्या संघर्षाच्या वेळी भारताने चीनला दिलेल्या प्रत्युत्तरापेक्षा लडाखमध्ये चीनला भारतीय सैन्य अधिक तयारीने प्रत्युत्तर देत आहे.

भारताने खूप वर्षे दुर्लक्ष केलेल्या काराकोरम खिंड व लडाखच्या सर्व strategic महत्त्वाच्या भागांमध्ये रस्ते, पूल बांधणीचा वेग वाढविल्याने सैन्याच्या हालचालींना वेग आला आहे. भारतीय सैन्याची प्रत्येक हालचाल चीनी सैन्याच्या कारवायांमध्ये अडथळा ठरत आहेत. चीन बिनदिक्कतपणे घुसखोरी करत होता त्याला आता परिणामकारक प्रतिरोध होतो आहे. ही चीनची खरी डोकेदुखी आहे. त्यातून चीन अधिक आक्रमक हालचाली करण्याचा प्रयत्न करतोय. पण त्यालाही भारताकडून खणखणीत उत्तर मिळतेय.

एरवी भारताच्या मवाळ भूमिकेमुळे चीनला मिळणारा first strike advantage भारताच्या अधिक आक्रमक भूमिकेमुळे चीनने गमावला आहे. त्यामुळे संघर्षबिंदूवर अनेक भागांमध्ये भारताची स्थिती चीनपेक्षा चांगली आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य उभे आहे.

सध्या चीनने आपल्या सैन्याला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ अभ्यास करण्यास रोखले आहे. चीनला उत्तर देण्यासाठी दुसरीकडे भारतीय सैन्याने दौलत बेग ओल्डी आणि आसपासच्या भागांमध्ये ८१ आणि ११४ ब्रिगेडला प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ तैनात केले आहे. त्यामुळेच अनेक ठिकाणी भारताची स्थिती ही चीनपेक्षा चांगली आहे.

चीनची आक्रमक भूमिका

भारतीय सैन्याच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनने आपले सैन्य आणि भारी वाहन पँगाँग त्सो झील आणि फिंगर एरियाजवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या पार तसेच भारताच्या सीमेजवळून हटवले आहेत. गालवान नाला क्षेत्रात चीनचे सैन्य सराव करताना दिसले जे भारतीय पोस्टपासून साधारण १०-१५ किमी दूर आहेत. येथे चीनचे अनेक सैनिक आणि आपले तंबूही तेथे ठोकले आहेत.

चीन भारतीय भागांसमोर रस्ते बांधत आहे. भारताने त्यावर आक्षेपही घेतला होता. मात्र चीनने काही ऐकले नाही आणि त्यांनी आपले काम चालूच ठेवले. २०१४ नंतर भारतीय सैन्याने आपल्या भागातही रस्ते आणि पूल बांधणी सुरू केली. गालवान भागात भारतीय सैन्याने गालवान तलावाच्या जवळ एका पुलाचे काम सुरू केले आहे. यावर चीनने नाराजी व्यक्त करून तेथे त्यांनी आपले सैन्य वाढवले.

भारताने वाढवले सैन्य

भारतीय पोस्ट केएम १२० मध्ये सैन्य दल आणि भारत-तिबेट सीमा पोलिसांचे २५० सैनिक तैनात असतात. भारत पूर्व लडाख क्षेत्रात चीनी ताकदीचा मुकाबला करण्यासाठी दौलत बेग ओल्डी सेक्टरमध्ये सैन्य भांडार बनवत आहे.

इतर सीमांवरही भारताची नजर

सूत्रांच्या माहितीनुसार, डीबीओ क्षेत्रात जुन्या प्रस्तावित रस्त्याचे काम पुन्हा केले जात आहे. यामुळे चीन भारतीय सेनेची हवाई पहाणी करू शकणार नाहीत. उत्तराखंड सह हिमाचल क्षेत्र आणि एलएसीच्य केंद्रीय क्षेत्रात ७० ब्रिगेडसह भारताने आपल्या सैन्याच्या संख्येत वाढ केली आहे. या भागांमध्ये चीनने आपली गस्त वाढविली आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात