रोहित पवारांना कोर्टाची नोटीस; मतदारांना घरोघरी हजार रुपये वाटले


विशेष प्रतिनिधी 
औरंगाबाद : सोशल मीडियावर कार्यकर्त्यांची फौज लावून राम शिंदे यांच्याविरोधात केलेला प्रचार आमदार रोहित पवार यांना भोवण्याची चिन्हे आहे. उच्च न्यायालयाने लाच दिल्याप्रकरणी पवार यांना नोटीस पाठविली आहे.
बारामती ऍग्रो कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन एक हजार रुपयांची लाच दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघाचे माजी आमदार राम शिंदे यांनी त्यांच्याविरोधात कोर्टात धाव घेतली आहे.
रोहित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत मतदारांना प्रलोभन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. औरंगाबाद खंडपीठाचे न्या. एस. एम. गव्हाणे यांनी आमदारासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत रोहित पवार यांनी आपला स्वतःचा पुणे जिल्हा सोडून नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड मतदारसंघातुन निवडणूक लढवली होती. बारामती ऍग्रो कंपनीच्या कर्मचाऱ्यांची फौज या मतदारसंघात उतरविली होती. दररोज बस भरून महिलांना विकासकामे दाखविण्याच्या बहाण्याने बारामती येथे सहलीसाठी नेण्यात येत होते.
यामुळेच निवडणूक प्रचारादरम्यान रोहित पवार यांनी भ्रष्ट पद्धतींचा अवलंब करीत मतदारांना लाच दिली, असा आक्षेप शिंदे यांनी घेतला आहे. विधानसभा निवडणूक प्रचारात विद्यमान आमदार राम शिंदे यांची बदनामी करण्यात आली. निवडणूक खर्चाचा तपशील लपविल्याचा आरोपही रोहित पवार यांच्यावर करण्यात आला आहे.
 रोहित पवार यांच्या प्रचारासाठी बारामती आग्रो लिमिटेडच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी देऊन कर्जत जामखेड मतदारसंघात पाठविले होते. या कर्मचाऱ्यांनी घरोघरी जाऊन मतदारांना प्रत्येकी १००० रुपयांची लाच देऊन रोहित पवार यांना मत देण्यास प्रलोभन केले, असाही आक्षेप याचिकेत घेण्यात आला आहे. या प्रकरणात काही कर्मचाऱ्यांविरुद्ध गुन्ह्याची नोंद आहे. ‘सोशल मीडियावर राम शिंदे यांची बदनामी करणारे संदेश पाठविण्यात आले. कर्मचाऱ्यांवर प्रचारासाठी केलेल्या खर्चाचा तपशील लपवून ठेवण्यात आला आहे,’ असाही आरोप आहे.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात