विनय झोडगे
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आर्थिक पँकेज काँग्रेस नेत्यांना रूचलेले दिसत नाही. येथे काँग्रेसच्या गांधी नेतृत्वाचा संबंध नाही. राजकारणाचा तर अजिबात नाही. संबंध आहे, तो गांभीर्याने देशाच्या अर्थकारणाचा विचार करणाऱ्या काँग्रेस नेत्यांचा. जयराम रमेश, पी. चिदंबरम, पृथ्वीराज चव्हाण आदी नेत्यांना मोदींचे हे पँकेज अजिबात रूचलेले नाही. त्यावर त्यांनी चमकदार भाषेत पण गंभीर टीका केली आहे. या टीकेचा सूर पाहिला किंवा between the lines वाचले तर त्यातील इंगित लक्षात येईल.
मोदींनी जाहीर केलेला प्रत्येक पैसा उद्योगांच्या, हजारो मैलांची पायपीट करून आलेल्या मजूरांच्या हातात पडतोय का, हे चिदंबरम मोजणार आहेत. हे पँकेज NAMO आहे. म्हणजे no action messaging only असे जयराम रमेश यांना वाटते. तर पृथ्वीराज चव्हाणांची पूर्ण निराशा झाली आहे.
हरकत नाही. लोकशाहीत तो त्यांचा अधिकार आहे. पण या तीनही नेत्यांची टीका विशिष्ट आर्थिक मनोवृत्तीतून आलेली आहे, ती म्हणजे elitist economic thought process. म्हणजे आम्ही करू तोच आर्थिक सुधारणेचा विचार. इतर कोणतेही विचार आर्थिक सुधारणा धोरणाच्या कक्षेत येत नाहीत. मोदींनी याच विचारसरणीला छेद देण्याचा प्रयत्न चालविला आहे. यात ते यशस्वी ठरतील की नाही हे येणारा काळ ठरवेल. पण मोदींचा हा प्रयत्न आहे, हे नक्की.
येथे काँग्रेसच्या १९९१ नंतरच्या आर्थिक सुधारणा धोरणाचा आणि मोदींनी अंगिकारलेल्या आर्थिक धोरणातील मूलभूत विचारसरणीचा भेद लक्षात घेतला पाहिजे. मोदींचे economics काँग्रेसच्या या think tank नेत्यांशी जुळणारे नाही. आर्थिक सुधारणा या संकल्पनेचा ढाचा जरी ढोबळ मानाने म्हणजे border lines वर सारखा असला तरी त्याचे तपशील मूलभूत पातळीवर वेगळे आहेत.
१९९१ नंतर अधिकृतरित्या समाजवादाला सोडचिठ्ठी देत काँग्रेसच्या think tank ने जे धोरण स्वीकारले ते बड्या उद्योगांना अनुकूल, मोठ्या आणि परकीय गुंतवणुकीला अनुकूल आणि भारताची economy जागतिक पटलावर स्पर्धा करू शकेल, असे स्वीकारले होते. ते त्या काळात गरजेचे आणि सुसंगतही होते. तेव्हा ती परिभाषा global होत चाललेली होती. जागतिक पातळीवरील अर्थशास्त्रींनी मांडलेल्या संकल्पनांच्या परिभाषेत ती मांडण्यात येत होती. काँग्रेसच्या think tank चे political आणि economic grooming त्या परिभाषेच्या वातावरणात झाले आहे. त्या धोरणाचा परिणाम देशात विशिष्ट मोठी आर्थिक केंद्रे विकसित होण्यात झाला. economic corridors तयार झाले. त्याने देशाच्या विकासाला चालना जरूर दिली. यात गृहीत धरलेला विकास झिरपत शेवटच्या आर्थिक घटकापर्यंत पोहोचलाच नाही, असेही नाही. पण त्याला मर्यादा आल्या. ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसचा think tank या मर्यादा मान्य करायला तयार नाही.
मोदींना या वास्तवाची जाणीव आहे. म्हणूनच त्यांच्या आर्थिक सुधारणा धोरणाची सुरवात MSME पासून होत असावी, असे मानण्यास वाव आहे. या खेरीज काँग्रेसच्या आणि भाजपच्या आर्थिक धोरणाच्या तपशीलातही हा मूलभूत फरक आहे. मोदींचे political आणि economic grooming संघाच्या स्वदेशीतून झाले आहे. मोदी आजच्या जागतिक संकटकाळात स्वदेशी शोधताहेत त्याचे मूळ त्यांच्या grooming मध्ये आहेच पण कोविड १९ ने त्यांना आर्थिक सुधारणा धोरणाची परिभाषा बदलणे भाग पाडले आहे. मोदींनी या धोरणाचा केंद्रबिंदू MSME ठेवण्याचे कारणही यात दडले आहे.
अल्पारंभ क्षेमकर:
यातून कदाचित भौगोलिकदृष्ट्या आणि आर्थिक क्षेत्रदृष्ट्या नव्या केंद्रांचाही विकास होईल. काँग्रेसच्या काळात विकसित झालेल्या economic zones च्याही पलिकडे विकासक्षेत्रे तयार होऊ शकतील. आणि कदाचित ती काँग्रेस नेत्यांच्या दृष्टीपथा पलिकडची असतील. म्हणून काँग्रेसच्या नेत्यांना मोदींचे पँकेज रूचत नसावे, असे वाटते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App