‘मेड इन इंडिया’चे मोठे यश; मालवाहतूकीचे १२ हजार हॉर्सपॉवरचे रेल्वे इंजिन रूळावर


विशेष प्रतिनिधी

  • FDI मधून फ्रेंच कंपनी अल्स्टॉमने बिहारच्या मधेपूरात बनविले मालवाहतूकीचे भारतातील सर्वाधिक १२ हजार हॉर्सपॉवर क्षमतेचे इलेक्ट्रीक रेल्वे इंजिन “Wag 12 लोकोमोटिव्ह”. जगातील मोठ्या हॉर्सपॉवरच्या इंजिन निर्मितीत भारताचा सहावा क्रमांक.
  • थेट परकीय गुंतवणुकीतून भारतीय रेल्वेचा पहिला मोठा प्रकल्प; ७४% गुंतवणूक फ्रेंच रेल्वे कंपनी अल्स्टॉमची. २६% गुंतवणूक भारतीय रेल्वेची. कंपनीशी ३.५ अब्ज युरोचा करार झाल्यानंतर ५ वर्षांमध्ये भारतातले सर्वांत मोठ्या क्षमतेचे पहिले इंजिन रूळावर.
  • अल्स्टॉम कंपनी आणि भारतीय रेल्वे यांच्या संयुक्त गुंतवणूकीतून भारतीय रेल्वेसाठी वेगवेगळ्या क्षमतेची ८०० इंजिन भारतात तयार करणार. दरवर्षीची क्षमता १२० इंजिने तयार करण्याची. १० हजार लोकांना प्रत्यक्ष – अप्रत्यक्ष रोजगार देण्याची क्षमता
  • Wag 12 B या इंजिनाची क्षमता ६००० टन मालवाहतूकीची. ११८ वाघिणी वाहून नेणार. वेगमर्यादा ताशी १२० किमी. आधुनिक जीपीएस सिस्टिमद्वारे ऑपरेटिंग. दोन्ही बाजूंना कंट्रोल ऑपरेटिंग सिस्टिम. चालकांसाठी एसी केबिन.
  • Wag 12 B पूर्व रेल्वे मालवाहतूक कॉरिडॉरच्या सेवेत रूजू. अल्स्टॉम कंपनीशी भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणाचे विविध प्रकल्प उभारणी तसेच सिग्नलिंग, कंट्रोल सिस्टिम उभारणीसाठी करार झाले आहेत. यातील पहिली कामे पूर्व रेल्वेसाठी सुरू झाली आहेत. अलाहाबादमध्ये रेल्वेची सर्वांत मोठी कंट्रोल सिस्टिम
    उभारण्याचाही या करारात समावेश आहे.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात