मुख्यमंत्री ठाकरे यांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल


  • भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे भाकित

विशेष प्रतिनिधी

कोल्हापूर : “शरद पवार सक्रिय झाल्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अपमानित होऊन सत्तेतून बाहेर पडावे लागेल,” असे भाकित भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी वर्तवले.

बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते. “हे घडायला नको असेल तर ठाकरेंनी पंतप्रधान मोदी यांना भेटून महाराष्ट्रातील स्थितीमध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती करावी,” असेही पाटील यांनी सुचवले.

मंत्री हसन मुश्रीफ आणि राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर यांना सतेज पाटील विश्वासात घेत नाहीत, अशी टीका पाटील यांनी केली. कोरोना संकटाचे गांभीर्य कोल्हापूरच्या प्रशासनास कळले नसून पालकमंत्री सतेज पाटील ‘हम करे सो कायदा,’ असा कारभार करत आहेत, असाही आरोप पाटील यांनी केला.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण