विनय झोडगे
मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र IFSC मुंबईतून हालवून गुजरात नेण्यावर आक्षेप घेणारे पत्र शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहून पुन्हा एकदा आपल्या साळसूदी राजकारणाचा प्रत्यत आणून दिला आहे.
या दोन पानी पत्रात पवारांनी आकडेवारीचा असा काही खेळ केला आहे, वरवर पाहणाऱ्याला वाटेल केवढे अभ्यासपूर्ण पत्र हे…!! साहेबांचा केवढा अभ्यास आहे, देशाच्या अर्थव्यवस्थेचा…!! खरेच आहे. पण या अभ्यासाचा साहेब positive वापर करतील तर ना…!! मोदींना पत्र लिहून त्यात आकडेवारीनिशी मुंबईचे आंतराष्ट्रीय महत्त्व पटवू पाहणाऱ्या साहेबांनी जरा आपल्याच अधिपत्याखालील आधीच्या आणि सध्याच्या सरकारांचे कर्तृत्व तपासून पाहायचे होते ना…!!
त्यावेळच्या केंद्र आणि राज्य सरकारांमध्ये साहेब आणि त्यांचा पक्ष महत्त्वाची पदे भूषवत होता ना… (साहेब केंद्रातल्या किचन कँबिनेटमध्ये नव्हते. ते नवव्या क्रमांकाचे मंत्रिपद भूषवत होते.) तरी तेव्हा का नाही मुंबईतल्या IFSC साठी हालचाल केली? त्यावेळी काय मुंबईला आंतराष्ट्रीय आर्थिक व्यवहारांमध्ये महत्त्व कमी होते काय? की देशाच्या GDP तला वाटा कमी होता? आणि मोदी सरकार आल्यावरच एकदम दोन्ही वाढले?
खरे तर पवारांनी मोदींना पाठविलेल्या पत्रातील आकडेवारी अजिबात नवीन नाही की त्यांनी मुंबईचे आर्थिक महत्त्व नव्याने अधोरेखित केलेले नाही. शाब्दिक आणि आकडेवारीच्या कसरतीपलिकडे या पत्रात महत्त्वाचा content काही नाही…!!
पण आपण कसे अभ्यासू आहोत. देशाच्या पर्यायाने मुंबईच्या आर्थिक विकासाची आपल्याला कशी काळजी आहे, हे दाखविण्यासाठी पवारांचा पत्रप्रपंच आहे. IFSC चा केंद्राचा प्रस्ताव आला त्यावेळी राज्य सरकारने त्याला प्रतिसाद दिला नाही. याचा एका ओळीचाही उल्लेख पत्रात नाही. त्यावेळी पवारांचा पक्ष सामील असलेले महाराष्ट्र सरकार आणि सध्याचे बहुमतावर दरोडा घालून आणलेले राज्य सरकार झोपा काढत होते काय? याचाही खुलासा पवारांनी केलेला नाही. “बैल गेला आणि झोपा केला” अशा स्टाइलचे हे पत्र आहे.
मुंबईतून गुजरातमध्ये IFSC नेल्याचा गहजब करण्याचेही एवढे कारण नाही कारण संपूर्ण देशात एकच एक IFSC असावे असा कायदा नाही. एक केंद्र गुजरातमध्ये गेल्याने आकाश कोसळणार नाही. महाराष्ट्रात दुसरे केंद्र होऊ शकते. यासाठी पवारांनी मोदींना लिहिण्याचा पत्रप्रपंच केलाय ना, तसाच आपणच बहुमतावर दरोडा घालून आणलेल्या तीन पायांच्या सरकारला जागे करण्यासाठी करावा. पुतण्या अर्थमंत्री आहेच. एेकेल की तो… अगदीच नाही म्हणणार नाही काकांना आणि काकींना…!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App