मास्क न लावता फिरण्याला बीजींग पालिकेने ठरवले ‘असभ्य’


वृत्तसंस्था


बीजींग : सार्वजनिक ठिकाणी वावरत असताना खोकताना किंवा शिंकताना तोंड आणि नाक न झाकण्याची वागणूक बीजींगच्या कम्युनिस्ट सरकारने आता “असभ्य” ठरवली आहे. एवढेच नव्हे तर त्यासाठी कायदा करुन शहरात वावरताना मास्क वापरणे प्रत्येक नागरिकाला बंधनकारक केले आहे.

चिनी विषाणूचा उद्रेक याच कम्युनिस्ट चीनमधून झाला आणि ही महामारी जगभर पसरली. एकट्या चीनमधल्या कोरोनाबाधितांची संख्या लाखाच्या घरात आहे. या पार्श्वभूमीवर चिनी विषाणूचा व अन्य संसर्गजन्य रोगांचा प्रसार रोखण्यासाठी चीनने सार्वजनिक स्वच्छता सुधारित करण्यासाठी रविवारी (दि. 26) नवी नियमावली लागू केली. “सुसंस्कृत वर्तनाला” प्रोत्साहन देण्यासाठी हा कायदा करत असल्याचे स्थानिक सरकारने म्हटले आहे.

या नव्या कायद्यानुसार आता सार्वजनिक ठिकाणी मास्क घातला नाही तर या गुन्ह्यासाठी आर्थिक दंडाची तरतूद करण्यात आली आहे. बीजींगच्या पालिका सरकारने संकेतस्थळावर ही माहिती दिली आहे. अन्य नियमावलीत सार्वजनीक ठिकाणी एक मीटर अंतराचे मार्कर निश्चित करणे, सामुदायिक जेवणांमध्ये अंतर आणि स्वच्छता पाळणे, चिनी आहाराचा भाग असलेल्या चॉपस्टीकच्या वापराचे नियम आदींचा समावेश आहे.

सार्वजनिक ठिकाणी वावरताना योग्य पद्धतीचे कपडे घातले पाहिजेत, उघड्या अंगाने फिरता येणार नाही, असेही सांगण्यात आले आहे. उन्हाळ्यातल्या गरम दिवसांमध्ये चिनी पुरुष पोट उघडे ठेवून सार्वजनिक ठिकाणी वावरत असतात.  

सार्वजनिक ठिकाणी थुंकणे, कचरा टाकणे, कुत्री फिरायला घेऊन जाणे, उंच इमारतींमधून वस्तू फेकणे, सार्वजनिक ठिकाणी शौचास जाणे व ज्या ठिकाणी प्रतिबंधित आहे अशा ठिकाणी धूम्रपान करणे यासह अनेक प्रकारच्या वर्तनांंना बीजींग पालिकेने यापुर्वीच “असुरक्षित” म्हणून दंडनीय ठरवले आहे. एवढेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे,

थुंकणे आणि शौच करण्याच्या दंडाच्या रकमेतही आता वाढ करण्यात आली असून त्यासाठी आता भारतीय चलनात सुमारे दोन हजार रुपये दंड आहे. घरातील कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने न लावणाऱ्या नागरिकांना तसेच सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना घेऊन फिरणाऱ्यांनाही जबर दंड ठोठावला जातो.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था