मजूर, कामगार, गरीब योजनांसाठी भारताला जागतिक बँकेकडून आणखी १ अब्ज डॉलरची मदत


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन 

  • मजूर, कामगार, शहरी – ग्रामीण गरीबांच्या सामाजिक सुरक्षा फंडाला जागतिक बँकेची १ अब्ज डॉलरची मदत जाहीर
  •  मोदी सरकार व राज्य सरकारांनी लागू केलेल्या ४०० कल्याण योजनांचा खर्च यातून भागविण्यात येणार आहे.
  • मोदींनी कोविड १९ पश्चात जीवनाला प्राधान्य देण्याबरोबरच उदरनिर्वाहालाही प्राधान्य दिल्याने जागतिक बँकेने समाधान व्यक्त केले आहे. आत्मनिर्भर भारत संकल्पनेचेही स्वागत केले आहे.
  • गेल्याच महिन्यात भारताला कोविड १९ प्रादूर्भावाचा मुकाबला करण्यासाठी वैद्यकीय सुविधांसाठी अशीच १ अब्ज डॉलरची मदत जाहीर केली आहे. त्यात आता सामाजिक सुरक्षा योजनेच्या १ अब्ज डॉलरची भर टाकण्यात आली आहे.
  • दोन्ही रकमा वेगवेगळ्या आहेत. त्या वेगवेगळ्या कारणांसाठी वापरायच्या आहेत.
  •  सामाजिक सुरक्षा योजनांसाठी देण्यात येणाऱ्या १ अब्ज डॉलरपैकी ५५० दशलक्ष डॉलरचा पतपुरवठा इंटरनँशनल डेव्हलपमेंटल असोसिएशकडून करण्यात येईल. २०० दशलक्ष डॉलरचे दीर्घ मुदतीचे कर्ज इंटरनँशनल बँक फॉर रिकन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट कडून देण्यात येणार असून त्याच्या परतफेडीची मुदत १८.५ वर्षांची असणार आहे. यात ५ जादा मुदतही देण्यात येईल. उरलेले २५० दशलक्ष डॉलर ३० जूननंतर भारताला देण्यात येतील.
Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात