भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर चीनी नरमले आहेत. आता चीनने अचानक नरमाईची भूमिका घेतली असून दोन्ही देश चर्चा करूनच मार्ग काढतील, असे चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतावर दबाव आणण्याचा प्रयत्न अयशस्वी झाल्यावर चीनी नरमले आहेत. आता चीनने अचानक नरमाईची भूमिका घेतली असून दोन्ही देश चर्चा करूनच मार्ग काढतील, असे चीनी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झाओ लिजियान यांनी सांगितले.
पँगोंग लेक, गलवान खोरे, डेमचोक आणि दौलत बेग ओल्डी येथे दोन्ही देशातील सैनिक आमने-सामने आले आहेत. गेल्या २० दिवसांपासून तिथे तणाव आहे. पेनगोंग त्सो लेक भागात 5 मे रोजी झालेल्या चकमकीच्या वेळी चिनी सैनिकांनी काठी, काटेरी तार आणि दगडांनी भारतीय सैनिकांवर हल्ला केला होता. चीनचे हजारो सैनिक तंबू ठोकून भारतीय सैनिकांना चिथावणी देत होते.
मात्र, यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपीन रावत आणि तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली. कोणत्याही सुरक्षा आव्हाानाचा सामना करण्यासाठी भारतीय सैन्य तयार असल्याचा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला. यामुळे चीनची भूमिका नरमाईची असल्याचे म्हटले जात आहे.
आता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाला पुन्हा एकदा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झालेल्या दोन अनौपचारिक भेटींची आठवण झाली आहे. देशांच्या नेत्यांनी महत्वाच्या अशा संमती आणि करारांचे सक्तीने पालन करणार असल्याचे आश्वासन दिले होते अशी आठवण झाओ यांनी यावेळी बोलताना करून दिली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीन वादात उडी घेण्याचा प्रयत्न केला. दोन्ही देशांत सुरू असलेल्या वादामध्ये अमेरिका मध्यस्थी करण्यासाठी तयार आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे, यापूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव सुरू असताना मध्यस्थी करण्याचा प्रस्ताव दिला होता. भारताने हा प्रस्ताव स्पष्टपणे फेटाळला होता. तसेच काश्मीर हा मुद्दा आपला अंतर्गत मुद्दा असल्याचे स्पष्ट केले होते.
भारतात चीनचे राजदूत सुन वीडोंग यांनी सांगितल्याप्रमाणे, भारत आणि चीन एकत्रित येऊन कोरोना व्हायरसचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहेत. संबंध चांगले ठेवणे ही दोन्ही देशांची जबाबदारी आहे. ही गोष्ट दोन्ही देशांतील युवकांना देखील समजायला हवी. आपसात फूट पाडतील अशा गोष्टींपासून आपल्याला दूर राहण्याची गरज आहे. परस्पर चर्चा करण्यासाठी आपसातील मतभेद दूर करणे आवश्यक आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App