बळीराजा देतोय देशाला आशेचा किरण; कृषीक्षेत्रात ३% वाढ अपेक्षित


  • नीती आयोगाच्या ताज्या सर्वेक्षणातील निष्कर्ष;
  • २०२० मध्ये समाधानकारक मान्सूनचा अंदाज आणि अपेक्षा

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कोरोना संकटात देशाच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर निराशेचे मळभ दाटून आले असताना कृषी क्षेत्रातून मात्र अत्यंत आशादायक बातमी येत आहे. या क्षेत्राच्या आर्थिक वाढीचा दर २०२० – २१ या आर्थिक वर्षात ३% नी अधिक असेल, असा निष्कर्ष नीती आयोगाने ताज्या सर्वेक्षणातून काढला आहे. २१ मे २०२१ रोजी उपलब्ध झालेल्या आकडेवारीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

गेल्या रब्बी हंगामात भारतीय शेतकऱ्यांनी काढलेले बंपर उत्पादन आणि यंदाच्या खरीप हंगामात करण्यात आलेली वाढीव क्षेत्रातील लागवड / लावणी यांच्या विश्वसनीय आकडेवारीतून सकारात्मक निष्कर्ष काढण्यात आला आहे. उद्योग, सेवा क्षेत्राच्या वाढीचा दर कमालीचा घटला असताना एकमेव कृषीक्षेत्राने वाढीचा दर ३% गाठणे ही बाब देशातील शेतकरी वर्गाचे विकासातील योगदान अधोरेखित करते. कोरोना संकटात तर त्याला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. याचा कृषीक्षेत्रातील रोजगार निर्मितीवर देखील सकारात्मक परिणाम दिसून येतो आहे.

  • देशात यंदा शेतकऱ्यांनी ३.४८ दशलक्ष हेक्टरवर तांदळाची लागवड केली आहे. गेल्या हंगामात हीच लागवड २.५२ दशलक्ष हेक्टरवर करण्यात आलेली होती. यंदा भाताच्या लागवड क्षेत्रात ३७% ची वाढ झाली आहे.
  • उन्हाळी हंगामातील महत्त्वाचा घटक म्हणजे सर्व प्रकारच्या कडधान्य / डाळींच्या लागवडीत ३३% वाढ झाली असून यंदा १.२८ दशलक्ष हेक्टरवर लागवड पूर्ण झाली आहे. गेल्या हंगामात ०.९६ दशलक्ष हेक्टरवर ही लागवड करण्यात आलेली होती.
  • बाजरी, ज्वारी व अन्य पुरक धान्य लागवडीचे प्रमाण ४२% नी वाढले असून यंदा १.०२८ दशलक्ष हेक्टरवर लागवड करण्यात आली आहे. मागील वर्षी याची लागवड ०. ७३ हेक्टरवर करण्यात आलेली होती.
  • या वर्षी ०.९२ दशलक्ष हेक्टरवर तेलबिया लागवड करण्यात आली असून गेल्या वर्षी .०७३ हेक्टरवर ही लागवड करण्यात आली होती. तेलबिया लागवड क्षेत्रातील वाढीचे प्रमाण १४% आहे.

कोरोना लॉकडाऊनमध्ये देशभरात सर्वच क्षेत्रातील आर्थिक उलाढालीला फटका बसला असला तरी कृषीक्षेत्रात काम सुरू होते. रब्बी हंगामातील पिकांची कापणी / काढणी, खरेदी – विक्री हे व्यवहार सुरू होते त्याच बरोबर येणारा मान्सून समाधानकारक असेल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

या पार्श्वभूमीवर जून २०२० नंतरच्या खरीप हंगामासाठी बियाणे, खते, शेती अवजारे यांची उत्पादन, खरेदी – विक्री हे व्यवहार सुरू होते आणि आहेत. या सर्वांचा एकत्रित परिणाम म्हणून (cumulative effect) म्हणून कृषीक्षेत्रातील वाढीच्या आकड्यांकडे पाहिले पाहिजे, असे मत नीती आयोगाने पेपरमध्ये नोंदविले आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात