पालघर येथील साधूंची मॉबलिंचींग करून हत्या करण्यात ख्रिश्चन मिशनऱ्यांचा हात होता का याबाबत आता विश्व हिंदू परिषद सत्य शोधणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेने एक फॅक्ट फाईंडींग टीम (सत्यशोधन समिती) तयार केली असून ती लवकरच पालघरला जाणार आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पालघर येथील साधूंच्या मॉबलिंचींग प्रकरणात ख्रिश्चन मिशनऱ्यांचा हात होता का याबाबत आता विश्व हिंदू परिषद सत्य शोधणार आहे. यासाठी विश्व हिंदू परिषदेने एक फॅक्ट फाईंडींग टीम तयार केली असून ती लवकरच पालघरला जाणार आहे.
ही टीम साधूंच्या हत्याप्रकरणाचा नव्याने तपास करणार आहे. त्यासाठी हत्येशी संबंधित असणाºया सगळ्या लोकांशी बोलून पुरावे शोधणार आहे. पोलीस आणि प्रशासनाला हे पुरावे सादर केले जाणार आहे. या हत्येप्रकरणात कम्युनिस्ट तसेच ख्रिश्चन मिशनऱ्यांचा हात होता का याबाबतही ते शोध घेणार आहे.
विश्व हिंदू परिषदेचे महामंत्री मिलिंद परांडे एका वेबसाईटशी बोलताना म्हणाले, महाराष्ट्रातील काही स्थानिक कार्यकर्ते पालघरला गेले होते. त्यांनी तेथील परिस्थिती सांगितली. परंतु, लॉकडाऊन असल्यामुळे दिल्लीतील टीम पाठविता आली नाही. परंतु, आता लवकरच ही टीम पाठविली जाणार आहे. यामध्ये महिला प्रतिनिधी, निवृत्त न्यायाधिश, संत समाजातील वरिष्ठ आणि विश्व हिंदू परिषदेचे काही पदाधिकारी असणार आहे. याठिकाणी जाऊन ते पूर्ण तपास करतील. या तपासाचा उद्देश केवळ मृत्यूमुखी पडलेल्या साधूंना न्याय देणे हेच आहे.
उध्दव ठाकरे यांच्यावर टीका करताना परांडे म्हणाले, हिंदू श्रध्दांचे प्रतिकचिन्ह असलेल्या साधूंचे रक्षण हे सरकार करू शकले नाही. महाराष्ट्र सरकारने यासाठी प्रयत्न करणे गरजेचे हेते. पालघरमध्ये हिंदूविरोधी शक्ती काम करत आहेत का, याबाबतही सरकारने विचार करण्याची गरज आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App