दिशाहिन विरोधकांकडे बोलण्यासाठी नाही मुद्दा; प्रकाश जावडेकर यांची टीका


चीनी व्हायरसविरुध्द देश लढत असताना  सरकार चांगले काम करत आहे. मात्र, विरोधक दिशाहीन आहेत. त्यांच्याकडे बोलण्यास कोणताच मुद्दा उरलेला नाही. सध्या ते चांगली चचार्ही करत नाहीयेत आणि सल्लादेखील देत नाहीयेत. ते आधी ज्या मुद्द्यांवर सहमती दर्शवत होते, आता त्यांवरच आरोप करत आहेत, अशी टीका केंद्रीय माहिती  आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : चीनी व्हायरसविरुध्द देश लढत असताना  सरकार चांगले काम करत आहे. मात्र, विरोधक दिशाहीन आहेत. त्यांच्याकडे बोलण्यास कोणताच मुद्दा उरलेला नाही. सध्या ते चांगली चचार्ही करत नाहीयेत आणि सल्लादेखील देत नाहीयेत. ते आधी ज्या मुद्द्यांवर सहमती दर्शवत होते, आता त्यांवरच आरोप करत आहेत, अशी टीका केंद्रीय माहिती  आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली.

देशातील चीनी व्हायरसच्या प्रादुर्भावाबाबत माहिती देताना जावडेकर म्हणाले, वाईट वेळ निघून केली आहे, पण जोपर्यंत व्हायरस संपुर्ण नष्ट होत नाही, तोपर्यंत नियमांचे पाल करावे लागेल. हे संक्रमण चीनमधून आले आहे, पण अद्याप याचे औषध मिळाले नाही. औषध मिळेपर्यंत आपल्याला व्हायरससोबतच जगावे लागेल. मास्क लावणे, सतत हात धुणे आणि सामाजिक अंतराचे पालन करणे, हे सर्वांसाठी गरजेचे आहे.

लॉकडाउनमुळे संक्रमण रोखण्यास मदत मिळाली आहे. लॉकडाउनच्या तिसर्या टप्प्यात 4 मे पासून अर्ध्या देशातील कामकाज पुर्ववत होईल. या रोगावर आमचे व्यवस्थापन इतर देशांपेक्षा खूप चांगले आहे. सर्व परिसरांना झोनमध्ये विभागले असल्यामुळे व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यास मोठ्या प्रमाणावर मदत मिळाली आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी करत असलेल्या आरोपांबाबत जावडेकर म्हणाले, काही लोकांना भारत आणि बंगालदरम्यान युद्ध करण्याचे ठरवले आहे. पण, आम्हाला यात काहीच रस नाही. आम्हाला त्या राज्याची मदत करायची आहे, तेथील समस्या दूर करायची आहे. भारताकडे सध्या खूप मोठी संधी आहे. या संधीचा फायदा देशाने घ्यायला हवा. आम्ही सर्व मोठ्या कंपन्याचे स्वागत करतो. मागील सहा वर्षात देशात मोबाइल फॅक्टर्यांची संख्या दोन वरुन 150 वर पोहचली आहे. आम्ही पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट्स आणि वेंटीलेटरदेखील बनवत आहोत.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था