जर्मन फूटवेअर कंपनी वॉन वेल्क्स चीन सोडून भारतात येणार

  • भारतीय कंपनी बरोबर आग्र्यात उत्पादन करणार

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : जर्मनीची प्रख्यात फूटवेअर कंपनी वॉन वेल्क्सने देखील चीनमधले उत्पादन युनिट बंद करून भारतात येण्याचा निर्णय घेतला आहे. आरोग्यदायी फूटवेअर बनविण्यात ही कंपनी अग्रगण्य मानली जाते.

या पाठदुखी, गुडघे – घोटेदुखी टाळण्यासाठी ही कंपनी स्पेशल फूटवेअर बनविते. आग्रा येथील फूटवेअर कंपनी आयट्रीक प्रा. लि. यांच्या बरोबर करार झाला असून लवकरच उत्पादन सुरू होईल, अशी माहिती आयट्रीक कंपनीचे सीईओ आशिष जैन यांनी दिली.

उत्तर प्रदेशात वॉन वेल्क्स कंपनीचे आम्ही स्वागत करतो. कंपनीचे मालक सासा एव्हज् गभ्म यांनी राज्यात मोठी गुंतवणूक केल्याने १० हजार प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष रोजगार तयार होतील, असे राज्याचे लघु उद्योगमंत्री उदय भान यांनी सांगितले.

वॉन वेल्क्स कंपनीची विविध उत्पादने ८० देशांमध्ये विकली जातात. भारतात २०१९ पासूनच ही उत्पादने ५०० रिटेल स्टोअरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आली आहेत.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*