केजरीवाल, तुम्ही सुद्धा? चीनी व्हायरसबाधितांच्या आकड्यातील घोळ अखेर कबूल


महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या आणि मृत्यूचा आकडे लपविल्याचे उघड झाले आहे. प्रामाणिपणाचा दंभ मिरविणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीमध्येही सरकार आकडे लपवत असल्याचे दिसून आले आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या रुग्णांच्या आणि मृत्यूचा आकडे लपविल्याचे उघड झाले आहे. प्रामाणिपणाचा दर्भ मिरविणाऱ्या अरविंद केजरीवाल यांच्या दिल्लीमध्येही सरकार आकडे लपवत असल्याचे दिसून आले आहे.

पश्चिम बंगालमधील चीनी व्हायरसचा प्रादुर्भाव अत्यंत कमी दाखवून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी केंद्राला वाकुल्या दाखवित होत्या. परंतु, केंद्रीय पथकाने त्यांची चोरी पकडली. महाराष्ट्रातही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकड्यांचा गोलमाल पुढे आणला होता. आता दिल्लीमध्येही असेच घडले आहे.

दिल्लीमध्ये कमी रुग्णसंख्या दाखविण्याचा केजरीवाल यांचा प्रयत्न होता, असे आरोप अनेक दिवसांपासून होत होते. परंतु, दिल्लीचे मुख्य सचिव विजय देव यांचे एक पत्र समोर आल्यावर या आरोपांवर शिक्कामोर्तब झाले आहे. या पत्रात देव यांनी नियमानुसार आकडे सरकारकडे पाठविण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे. चीनी व्हायरसने झालेल्या मृत्यूची आकडेवारी देण्यासाठी दिल्लीमध्ये आरोग्य मंत्रालयाने डेथ ऑडिट कमिटी केली होती.

त्यानंतर आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन म्हणाले होते की सरकार आकडे लपवित नाही. रुग्णालयांकडून आकडे उशिरा मिळाल्यामुळे ही त्रुटी राहते. मात्र, देव यांनी पत्रामध्ये स्पष्ट म्हटले आहे की रुग्णालये आपल्या येथे होणाऱ्या मृत्यूचा आकडे डेथ ऑडिट कमिटीकडे पाठवित नाही, असे दिसून आले आहे. दिल्लीतील एनएनजेपी रुग्णालयात सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. मात्र, त्यांनीच आकडे लपविल्याचे दिसून आले आहे.

भारतीय जनता पक्षाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अरविंद केजरीवाल सरकार स्वत:चे काम सिध्द करण्यासाठी मृत्यूच्या आकडेवारीबाबत खेळ करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण