काश्मीरप्रश्नावरून अमेरिकेत विष पेरतोय ‘स्टॅंड वुईथ काश्मीर’ गट


वृत्तसंस्था

वॉशिंग्टन : काश्मीरमधील ३७० कलम हटविल्यानंतर भारताविरुध्द गरळ ओकण्यासाठी स्टँड वुईथ काश्मीर ( एसडब्ल्यूके) नावाचा गट तयार झाला आहे. या गटाकडून अमेरिकेत भारताविरुध्द वातावरण तयार केले जात आहे. धक्कादायक म्हणजे या गटाला शिक्षणतज्ज्ञांकडूनच पाठिंबा दिला जात आहे. या गटाकडून हिंसाचाराचे समर्थनही करण्यात येत आहे.

मिडल ईस्ट फोरम नावाच्या अमेरिकेन संस्थेच्या म्हणण्यानुसार, एसडब्ल्यूके भारतीय सैनिक आणि नागरिकांच्या हत्या घडविणाऱ्यांना पाठिंबा देत आहे. अमेरिकेतील अनेक अनेक विद्यापीठांत या गटाने आपल्या शाखा उघडल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून विद्यापीठांमध्ये विद्यार्थ्यांना भडकाविले जात आहे. त्याचबरोबर अनेक ठिकाणी जमाते इस्लामीसारख्या दहशतवादी संघटनांचे दहशतवादी भाषणे देत आहेत.

एसडब्ल्यूके ही संघटना नक्की कोणी सुरू केली याबाबत कोणतीही माहिती नाही. त्याचा प्रमुख कोण याबाबतही उल्लेख नाही. मात्र, संघटनेच्या वेबसाईटवर असलेल्या अनेक नावांना शिक्षणतज्ज्ञ म्हटले आहे. त्यातील अनेक जण हे मानवाधिकार, स्त्री-पुरुष समानता यासारख्या बुरख्यांआडून काम करत आहेत. काश्मीरमधील स्थानिक जनतेवर अन्याय अत्याचार होत आहेत. येथील महिला लष्कराला विरोध करत आहेत, असे या संघटनेकडून सांगण्यात येत आहे. साम्राज्यवादी देशाच्या विरुध्द लढण्यासाठी विद्यार्थ्यांना भडकावले जात आहे.

परंतु, त्यामध्ये दहशतवादालाच प्रोत्साहन दिले जात आहे. धक्कादायक म्हणजे या संघटनेने हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी रियाझ नाईकू ठार झाल्यावर शोकसभेचे आयोजन केले होते.
एसडब्ल्यूकेने सगळ्या काश्मीरी कैद्यांच्या सुटकेची मागणी केली आहे. त्यांच्या मते हे सगळे अहिंसक आंदोलक आहेत. परंतु, यामध्ये काही खतरनाक दहशतवादी असल्याचे मात्र सोईस्करपणे विसरले जात आहे.

इकॉनॉमिस्ट या साप्ताहिकाच्या म्हणण्यानुसार, एसडब्ल्यूके जिहादचे समर्थन करत आहे. त्यांच्या एका कार्यकर्त्याने आपल्या मुलाखतीत सांगितले होते की त्यांनी अल कायदाच्या नेत्यांची भेट घेतली होती. ओसामा बिन लादेनचेही त्याने समर्थन केले आहे. त्याचबरोबर दहशतवादी नेता यासिन मलिक याच्यावरही स्तुतीसुमने उधळली जात आहेत. याच मलिकने पाकव्याप्त काश्मीरमध्ये जाऊन लष्कर ए तय्यबाच्या कॅंपमध्ये जाऊन दहशतवाद्यांशी संवाद साधला होता.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात