काश्मीरचे सोडा, बांगला देश लक्षात आहे ना?, गंभीरने आफ्रिदीला फटकावले

पाकिस्तानला काश्मीर कधीच मिळणार नाही. पण बांगला देश तुमच्या लक्षात आहे ना? अशा शब्दांत प्रसिध्द क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचा खासदार गौतम गंभीर याने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला फटकारले आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी यावरून आफ्रिदीची धुलाई सुरू केली आहे.


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : पाकिस्तानला काश्मीर कधीच मिळणार नाही. पण बांगला देश तुमच्या लक्षात आहे ना? अशा शब्दांत प्रसिध्द क्रिकेटपटू आणि भारतीय जनता पक्षाचा खासदार गौतम गंभीर याने पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला फटकारले आहे. अनेक भारतीय क्रिकेटपटूंनी यावरून आफ्रिदीची धुलाई सुरू केली आहे.

काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने काश्मीरबद्दल काही वक्तव्ये केली होती. त्यावर गंभीरने आफ्रिदीला चांगलेच सुनावले आहे. गंभीर म्हणाला, पाकिस्तानची लोकसंख्या २० कोटी एवढी आहे, तर त्यांच्याकडे

सात लाखांचे सैन्य आहे. तुम्ही गेल्या ७० वर्षांपासून काश्मीरची भीक मागत आहेत. भारत आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करणारे आफ्रिदी आणि इम्रान खान हे जोकर आहेत. कारण ते पाकिस्तानच्या लोकांची फसवणूक करत आहेत. त्याचबरोबर ते मोदी यांची प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा निर्णय येईल, तेव्हा तुम्हाला काश्मीर मिळणार नाही. तुम्हाला बांगलादेश लक्षात आहे ना?

काश्मीरबद्दल बोलताना आफ्रिदीने मुक्ताफळे उधळली होती. पाकव्याप्त काश्मीर भागात मदतकायार्साठी आलेल्या शाहिद आफ्रिदीचा व्हिडीओ व्हायल झाला आहे. तो म्हणाला होता की, नरेंद्र मोदी हे भित्रे आहेत. कारण त्यांनी सात लाख सैन्य फक्त काश्मीरमध्येच ठेवले आहे. आमच्या देशाचा विचार केला तर पाकिस्तानात मिळून सात लाखांचे सैन्य आहे. त्यांच्या मागे आमचे २० कोटी लोकांचे सैन्यही आहेच. मोदी हे धर्माचे राजकारण करतात. काश्मीरमधील जनतेला आतापर्यंत दिलेल्या त्रासाबद्दल उत्तर मोदींना द्यावं लागेल. सध्या संपूर्ण जग चीनी व्हायरसशी लढत आहे. मात्र मोदींच्या मनात यापेक्षाही घातक विष भरलेले आहे.

प्रसिध्द क्रिकेटपटू हरभजन सिंहनेही याबाबत संताप व्यक्त केला आहे, तो म्हणाला, शाहिद आफ्रिदीकडून अशा प्रकारचं वक्तव्य येणं हे खरंच दुर्दैवी आहे. आमच्या देशाविरोधात आणि पंतप्रधानांविरोधात वाईट बोललेलं कधीही खपवून घेतलं जाणार नाही. काही दिवसांपूर्वी त्याने आम्हाला चॅरिटीसाठी एक व्हिडीओ पाठवण्याची विनंती केली होती आणि सध्याची परिस्थिती पाहता माणुसकीच्या नात्यातून मी आणि युवराजने शाहिदच्या संस्थेला मदत करण्याचं आवाहन केलं. पण अशा प्रकारचं वक्तव्य करुन त्याने आता सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. यापुढे माझा आणि त्याचा काहीही संबंध नाही. २० वर्ष मी माझ्या देशाचं प्रतिनिधीत्व केलंय. मी भारतात जन्मलो आणि भारतातच अखेरचा श्वास घेईन. उद्या देशाला माझी गरज लागली तर बंदूक घेऊन मी सीमेवर जायलाही मागेपुढे पाहणार नाही.

भारताचा सलामीवीर शिखर धवन म्हणाला, यावेळी संपूर्ण जग चीनी व्हायरसशी लढत आहे, मात्र तुम्हाला काश्मीरची चिंता आहे. काश्मीर आमचे होते, आमचे आहे आणि आमचेच राहिल. तुम्ही २२ कोटी घेऊन या आमचा एक जण सव्वा लाखांचा मुकाबला करेल. बाकीचे सगळे गणित तुम्हीच करा.

काश्मीरबाबत भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी आता पाकिस्तानची क्रिकेटपटूंची फौज उतरली आहे. मात्र, भारताच्या खेळाडूंच्या मुद्देसुद उत्तरांपुढे त्यांची पळापळ होताना दिसते आहे.

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*