काँग्रेसी निवृत्त न्यायाधीशाकडून नीरव मोदीची लंडन कोर्टात वकिली; भाजपकडून टीकास्त्र


विशेष प्रतिनिधी

लंडन : नीरव मोदीची केस भारतीय कायद्यानुसार न्यायालयात उभीच राहू शकत नाही. कारण त्याने केलेल्या कोणत्याही व्यवहारातून कोणाची फसवणूक झालेली नाही. किंवा त्याने लबाडी केल्याचे दिसत नाही, असा धक्कादायक दावा मुंबई आणि अलाहाबाद उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश अभय ठिपसे यांनी लंडन कोर्टात केला.

नीरव मोदीने पंजाब नँशनल बँकेतून कर्ज रूपाने ६७०० कोटी रुपये लेटर ऑफ अंडरटेकिंग देऊन उचचले आहेत. ही लबाडी नाही. यात कोणाचीही फसवणूक झालेली नाही. त्याच्या हातात बँकेचे लेटर ऑफ अंडरटेकिंग आहे. भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा नाही, असा धक्कादायक दावा न्या. अभय ठिपसे यांनी केला. विडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून ते लंडन कोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाले होते.

नीरव मोदीने पंजाब नँशनल बँकेकडे २०११ ते २०१८ या कालावधीत कर्जांसाठी अर्ज केले. परंतु ती अधिकृतरित्या मंजूर होण्यापूर्वीच बँक अधिकाऱ्यांशी संगनमत करून लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळविली. त्या आधारे वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या रकमा उचलल्या. या सर्व रकमा मिळून सात वर्षांच्या कालावधीत ६,४९८ कोटी रुपये भरली. अर्जांवर विचार करून कर्ज मंजूर करण्यापूर्वीच ही रक्कम कर्ज म्हणून उचलण्यात आली होती. यात व्याजदराचाही घोळ घालण्यात आला होता.

मात्र यात कुठेही नीरव मोदीने लबाडी किंव् फसवणूक केलेली नाही. लेटर ऑफ अंडरटेकिंग मागणे आणि देणे हा गुन्हेगारी स्वरूपाचा कट ठरू शकत नाही, असा दावा न्या. अभय ठिपसे यांनी केला.

न्या. अभय ठिपसे यांची कारकीर्द वादग्रस्त आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या खटल्यांमध्ये त्यांनी दिलेले निकाल आणि व्यक्त केलेली मते वादग्रस्त ठरली आहेत. हेमंत करकरे मुंबई हल्ल्यात दहशतवाद्यांकडून मारले गेले नाहीत तर ब्राह्मण हिंदुत्ववाद्यांनी त्यांचा खून केला, असा वादग्रस्त दावा करणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्या पुस्तकाचे प्रकाशन ठिपसे यांनी केले आहे.

अशा सेक्युलर लिबरल अभय ठिपसे यांनी २०१८ मध्ये राहुल गांधींशी सल्लामसलत केल्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. नीरव मोदीला पळून जाण्यात भाजपने मदत केल्याचा आरोप काँग्रेसने यापूर्वीच केला आहे. आणि आता याच काँग्रेसचे नेते न्यायाधीश अभय ठिपसे हे नीरव मोदी कसा गुन्हेगार नाही, हे लंडन कोर्टाला सांगत आहेत. यातील विसंगती लक्षात घेण्याजोगी आहे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात