अर्थव्यवस्थेचे चक्र फिरू लागले, मारुती सुझुकीचे उत्पादन, हिरोची विक्री सुरू


‘जान भी और जहान भी,’ असे म्हणत चीनी व्हायरसच्या संकटातही अर्थव्यवस्थेचे चक्र फिरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी सज्ज झाले आहेत. त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळू लागला आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने देखील मानेसर प्रकल्पातील उत्पादन सुरू केले आहे. हीरो मोटोकॉर्पने नव्याने व्यवहार सुरू करत आपले दीड हजार रिटेल आऊटलेटस् सुरू केले आहेत. यात गेल्या काही दिवसांत दहा हजार मोटारसायकल व स्कूटरची विक्री झाली आहे.

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ‘जान भी और जहान भी,’ असे म्हणत चीनी व्हायरसच्या संकटातही अर्थव्यवस्थेचे चक्र फिरविण्यासाठी पंतप्रधान नरेंद मोदी सज्ज झाले आहेत.
त्याला सकारात्मक प्रतिसादही मिळू लागला आहे. देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या मारुती सुझुकीने देखील मानेसर प्रकल्पातील उत्पादन सुरू केले आहे. हीरो मोटोकॉर्पने  नव्याने व्यवहार सुरू करत आपले १५०० रिटेल आऊटलेटस् सुरू केले आहेत. यात गेल्या काही दिवसांत १० हजार मोटारसायकल व स्कूटरची विक्री झाली आहे.
मानेसर प्रकल्पात उत्पादन सुरू झाले असून पहिली कार मंगळवारी तयार होणार आहे. सध्याच्या काळात ७५ टक्के कर्मचार्यांच्या मदतीने एकाच पाळीमध्ये उत्पादन सुरू केले आहे. परंतु, पूर्ण क्षमतेने काम सुरू करणे नियमांवर अवलंबून असेल, असे मारुती सुझुकी इंडियाचे अध्यक्ष आर.सी. भार्गव यांनी सांगितले आहे.
हीरो मोटोकॉर्पने लॉकडाऊन लागू झाल्यानंतर नव्याने व्यवहार सुरू करत आपले १५०० रिटेल आऊटलेटस् सुरू केले आहेत. यात गेल्या काही दिवसांत कंपनीने १० हजार मोटारसायकल व स्कूटरची विक्री झाली आहे. दुचाकी वाहननिर्मिती क्षेत्रातील या कंपनीने नियामकांना दिलेल्या माहितीनुसार, अधिकृत वितरक व सर्व्हिस आऊटलेट सुरू करण्यात आले आहेत.
यात देशांतर्गत विक्रीमध्ये त्यांचा ३० टक्के वाटा राहिला. कंपनीने आपल्या प्लँटमधून ७ मे रोजी वाहने पाठवणे सुरू केले आहे. ४ मे रोजी कंपनीने हरियाणातील धारुहेरा आणि गुरुग्राम तसेच उत्तराखंडमध्ये हरिद्वार या तीन ठिकाणी उत्पादन सुरू केले होते. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर काम सुुरू करणारी ही पहिली दुचाकी निर्मिती क्षेत्रातील कंपनी ठरली.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात